विंग कमांडर यांचे केंद्रीय संरक्षण राज्य मंञी डॉ.सुभाष भामरे यांनी कौतूक केले

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – विंग कमांडर यांनी पाकिस्तानातून भारतात हल्ला करण्यासाठी तीन विमाने पाठवीली होती. त्यातील पाकिस्तानाचे एक विमान विंग कमांडर अभिनंदन यांनी अचूक मारा करुन नष्ट केले.

त्यानंतर त्यांचे फायटर विमानात बिघाड झाला त्यांनी पँरेशूट द्वारे पाकिस्तानाच्या हद्दीत उतरले तिथे उतरल्यावर हि भारत माता कि जय असा जय घोष केला. तेथील नागरीकांनी त्याचेवर हल्ला केला. त्यावेळी बचावसाठी हवेत फायर करत जवळ असलेले पुरवा नष्ट केले. पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना पकडले दोन दिवसांनी जीनीव्हा कररा नुसार सुटका करण्यात आली. भारतात परत वाघा सीमेहून आत दाखल झाले. या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वागत केले.

त्यानंतर आज सकाळी धुळ्याचे केंद्रीय संरक्षण राज्य मंञी डॉक्टर सुभाष भामरे यांनी विंग कमांडर यांची भेट घेतली व देशसेवा व चांगल्या कामगीरी बद्दल अभिनंदन केले. देशातील तरुणांना आपल्या केलेल्या कार्यातून प्रेरणा मिळले व देशासाठी पुढील काळात आपल्या प्रमाणेच शुर वीर देश सैनिक तयार होतील. अशी भेटी दरम्यान चर्चा झाल्याचा दुजोरा देण्यात आला आहे.