Dr Vijaykumar Gavit On Caste Certificate | जातीचे दाखले वेळेत देण्यासाठी नियम करणार – डॉ. विजयकुमार गावित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dr Vijaykumar Gavit On Caste Certificate | शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागणाऱ्यांना संबंधित उमेदवारांना जातीचे दाखले (Caste Verification Certificate) आवश्यक असतात. हे दाखले वेळेत देण्यासाठी नियम करण्यात येतील, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr Vijaykumar Gavit On Caste Certificate) यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम (Atram Dharmarao Baba), डॉ. किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamate), अशोक पवार (MLA Ashok Pawar), नाना पटोले (Nana Patole), सुनील भुसारा (MLA Sunil Bhusara), डॉ. देवराव होळी (MLA Dr. Deorao Holi) यांनी आदिम जनजाती समाज शासनाच्या सेवांपासून वंचित राहण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री डॉ. गावीत (Dr Vijaykumar Gavit On Caste Certificate) म्हणाले की, राज्यातील तीन आदिम जमातींसाठी मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai University) सर्वेक्षण करण्यात आले आहे. गावांगावांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ग्रामसखीची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामसखीमार्फत कागदपत्रे देताना त्या त्या कागदपत्रातील त्रुटी दूर करुन काम करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune District) मुळशी तालुक्यात (Mulshi Taluka) महाराजस्व अभियानाअंतर्गत 1 जानेवारी 2021 ते 28 फेब्रुवारी 2023 या काळात 35 ठिकाणी शिबीरे घेण्यात आली. यावेळी आदिम जमातीच्या लाभार्थींना विविध दाखले देण्यात आले. यामध्ये आधार कार्ड 539, जॉब कार्ड 74, उत्पन्न प्रमाणपत्र 74,रेशनकार्ड 112, जात प्रमाणपत्र 108 असे एकूण 907 दाखले आणि प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.

आदिवासी समुदायांच्या रहिवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी शबरी घरकुल योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत जमीन घेण्यासाठी 50 हजार रुपये देण्यात येतात, यामध्ये आवश्यक असल्यास अधिक पैसे वाढवून देण्यात येतील.
आदिम जमातीविषयक सन 2018 ते 2020 या काळात मुंबई विद्यापीठाच्या मुंबई
अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण संस्थामार्फत प्रथम रेषा सर्वेक्षण करण्यात आले आहे.
यामध्ये कातकरी जमातीचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून
आदिम जमाती विकास धोरण तयार करण्यासाठी संशोधन आणि गरजा यावर आधारित
अभ्यास करण्यात आला आहे. तसेच आदिम जमाती विकास धोरण निश्चित करण्यात येत असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले.

Web Title : Dr Vijaykumar Gavit On Caste Certificate | Tribal Development
Minister will make rules for issuing caste certificates in time. Vijayakumar Gavit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Salman Khan | जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान खानने दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाला….

Maharashtra Budget 2023 | अर्थसंकल्प राज्याचा…संकल्प पुण्याच्या विकासाचा…!