Dr Vishwas Mehendale Passed Away | ज्येष्ठ माध्यमकर्मी, दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dr Vishwas Mehendle Passed Away | ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन झालं असून वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी दूरदर्शनवर (Television) पहिले वृत्तनिवेदक (Reporter) म्हणून कारकीर्द गाजविली होती. आज सकाळी त्यांचे मुलुंड येथे मुलीच्या घरी निधन (Dr Vishwas Mehendale Passed Away) झाले.

मागील दोन ते तीन महिन्यांपासून ते आजारी होते. दीर्घकाळ पुण्यात वास्तव्याला असणारे डॉ. मेहेंदळे गेले काही दिवस मुलुंड येथे त्यांच्या मुलीकडे वास्तव्याला होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी मुलुंड येथेच अंतिमसंस्कार केले जाणार आहेत. (Dr Vishwas Mehendale Passed Away)

ADV

दूरदर्शनवर वृत्त निवेदक म्हणून कारकिर्द सुरु केल्यानंतर ते माध्यमांशी जोडले गेले.
डॉ. मेहेंदळे यांनी नाटकातूनही काम केले. एकच प्याला, नांदा सौख्य भरे, प्रेमा तुझा रंग कसा, भावबंधन अशा विविध नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. मला भेटलेली माणसं हा त्यांचा एकपात्री कार्य़क्रम खूप गाजला.

साहित्यिक म्हणून देखील त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
आपले पंतप्रधान, मला भेटलेली माणसे, नरम गरम हा कथासंग्रह अशा 18 पुस्तकांचे लेखन त्यांनी केले.
सुरुवातीच्या काळात डॉ. मेहेंदळे हे पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेत कामाला होते.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकपद देखील त्यांनी भूषविले होते.

Web Title :- Dr Vishwas Mehendale Passed Away | first marathi news reader of doordarshan dr vishwas mehendale passes away at the age of 84

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mallika Sherawat | मल्लिकाने अंदमान येथील ‘ताज’ हॉटेलमधील बोल्ड फोटो केले शेअर; चाहते झाले घायाळ

Aadhaar Card Security | आधार धारकांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ टिप्स फॉलो करून आधार डाटा ठेवा सुरक्षित, जाणून घ्या डिटेल्स

Pune Crime News | ‘चिक्या’ भाईला शिव्या दिल्याच्या कारणावरुन दोघा युवकांवर चाकूने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न