Mallika Sherawat | मल्लिकाने अंदमान येथील ‘ताज’ हॉटेलमधील बोल्ड फोटो केले शेअर; चाहते झाले घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन : Mallika Sherawat | अभिनेत्री मल्लिका शेरावतला आज कोणीच विसरू शकत नाही. 2004 साली आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटात तिने बोल्डनेसची सीमा पार केली होती. या चित्रपटातील गाण्यांमुळे त्याचबरोबर तिच्यातील आणि इम्रान हाशमी यांच्यातील बोल्ड सीनमुळे आजही लोक तिला विसरले नाहीत. या चित्रपटानंतर मल्लिका शेरावत वर बोल्ड अभिनेत्रीचा शिक्का बसला तो कायमचाच बसला. आता मल्लिकाचे याच धाटणीतले काही फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. (Mallika Sherawat)

मर्डर चित्रपटानंतर मल्लिका काही चित्रपटात झळकली. यानंतर ति चित्रपटसृष्टीतून चार हात लांब दिसली. चित्रपटसृष्टीतून जरी ती लांब असली तरी ती सोशल मीडियावर चांगली सक्रिय होती. तिचे अनेक फोटोज, योगाचे व्हिडिओज आणि सुट्टी एन्जॉय करतानाचे व्हिडिओ चाहत्यांसाठी ती नेहमीच शेअर करत असे. नुकताच मल्लिकाने अंदमान येथील ताज हॉटेल मधील काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. (Mallika Sherawat)

यावेळी मल्लिका अंदमानमध्ये सुट्टी एन्जॉय करत असून ताज हॉटेलच्या स्विमिंग पूल मध्ये तिने भगव्या रंगाची बिकनी परिधान करून बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे. सध्या मल्लिकाचे हे बिकनी मधील फोटोने तिचे चाहते घायाळ झाले आहेत. तर तिचा हा हॉट लूक पाहून काहींनी ‘मर्डर चार’ या चित्रपटाची मागणी केली आहे. तर काहीनी कमेंट करत जुन्या चित्रपटातील ‘भिगे होंट तेरे’ या गाण्याची आठवण करून दिली आहे.

एकीकडे भगव्या बिकनी वरून वाद सुरू आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा मल्लिकाने बोल्ड अंदाज मध्ये भगव्या रंगाची बिकनी परिधान करत चाहत्यांकडून चांगलीच वाहवाई करून घेतली आहे. तर मल्लिकाने आजवर ‘प्यार के साइड इफेक्ट’, ‘वेलकम’, ‘डबल धमाल’, या सुपरहिट चित्रपटात दिसली होती. तर ती नुकतीच रजत कपूरच्या ‘आरकेय’ या चित्रपटात झळकली होती.

Web Title :- Mallika Sherawat | mallika sherawat bold look in saffron bikini at taj exotica in andaman fan wants murder 4

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KGF 3 | रॉकी भाईच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली ! KGF 3 च्या रिलीज डेट बाबत समोर आली ‘हि’ मोठी अपडेट

Aadhaar Card Security | आधार धारकांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ टिप्स फॉलो करून आधार डाटा ठेवा सुरक्षित, जाणून घ्या डिटेल्स