Aadhaar Card Security | आधार धारकांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ टिप्स फॉलो करून आधार डाटा ठेवा सुरक्षित, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : Aadhaar Card Security | बदलत्या काळानुसार आधार कार्ड (Aadhaar Card) ची उपयुक्तता खूप वाढली आहे. ते एक अतिशय महत्त्वाचे आयडी म्हणून वापरले जाते. व्यक्तीचे नाव, पत्ता, वय, लिंग अशी महत्त्वाची माहिती आधार कार्डमध्ये नोंदवली जाते. अशावेळी आधारशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार आधारद्वारे बँक खात्याचे तपशील मिळवून अनेक वेळा खाते रिकामे करतात. यासाठी आधार डेटा वाचवण्याकरता UIDAI लोकांना अनेक उपाय सांगत आहे. UIDAI अशा अनेक सेवा पुरवते ज्याद्वारे आधारचा गैरवापर टाळता येऊ शकतो. याविषयी जाणून घेऊया (Aadhaar Card Security) –

व्हर्च्युअल आधार वापरा

पुष्कळदा फिजिकल आधार कार्डद्वारे डेटा चोरीच्या घटना समोर येतात. हे टाळण्यासाठी व्हर्च्युअल आधार कार्ड वापरू शकता. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा My Aadhaar Portal वर जाऊन Virtual ID तयार करू शकता. यानंतर हे व्हर्च्युअल आधार कार्ड सहज वापरू शकता. हे आधार हरवण्याचीही शक्यता कमी आहे.

आधार लॉक सेवा वापरा

तुम्ही UIDAI ची बायोमेट्रिक लॉकिंग सुविधा (Biometric Locking Facility) वापरू शकता. यामुळे आधारचा बायोमेट्रिक्सचा गैरवापर टाळता येईल आणि तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचे आधार वापरू शकणार नाही. यासाठी UIDAI ची अधिकृत वेबसाइर्ट www.uidai.gov.in ला भेट द्या. यानंतर My Aadhaar पर्याय निवडा. यानंतर Aadhaar Services निवडा आणि Lock/Unlock Biometrics निवडा. पुढे, आधार क्रमांक टाकून ओटीपी भरा. यानंतर आधार ताबडतोब लॉक आणि अनलॉक होईल. (Aadhaar Card Security)

आधार हिस्ट्री जाणून घ्या

UIDAI आधार यूजार्सना आधार वापराची हिस्ट्री जाणून घेण्याची सुविधा देखील देते.
तुम्ही तुमचे आधार कुठे-कुठे वापरले हे येथे समजते.
आधार हिस्ट्री जाणून घेण्यासाठी, यूआयडीएआयची वेबसाइट किंवा एम-आधार अ‍ॅप वापरावे.
याद्वारे आधारची मागील ६ महिन्यांची हिस्ट्री तपासता येईल.
जर आधारचा गैरवापर झाला असेल तर UIDAI ला त्याची माहिती देऊ शकता.

Web Title :-Aadhaar Card Security | aadhaar card use these services to secure personal data on aadhaar card know detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalgaon ACB Trap | 20 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ajit Pawar | अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना फटकारलं, म्हणाले – ‘लोकप्रतिनिधी झाला म्हणजे शिंगे फुटली का?’

Lady Police Constable Suicide | धक्कादायक! नाईट ड्युटीवरुन येताच महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या