डोळेझाप होण्यापुर्वीच शत्रू उध्दवस्त होणार, DRDO नं केलं लेजर गायडेड अ‍ॅन्टी टँक मिसाइलचं परीक्षण

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) ताणतणावा दरम्यान संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेला (डीआरडीओ) आणखी एक मोठे यश मिळाले आहे. एमबीटी अर्जुन टँककडून लेझर गाईडेड अँटी टँक गाईडेड मिसाईल (एटीजीएम) ची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

या यशाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, अहमदनगरमधील केके रेंज (एसीसी अँड एस) येथे एमबीटी अर्जुन कडून लेझर गाईड अँटी टँक गाईडेड क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याबद्दल डीआरडीओचे अभिनंदन. नजीकच्या काळात आयात निर्भरता कमी करण्याच्या दिशेने काम करणाऱ्या डीआरडीओचा भारताला अभिमान आहे.