Dream Girl 2 | ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाचे पोस्टर आऊट; पोस्टरमधील स्त्रीच्या सावलीने वेधले लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमध्ये सध्या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्विलची रीघ लागली (Bollywood Upcming Movie) आहे. एकामागून एक चित्रपटाचे सिक्विल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मोठ्या पडद्यवर येणार आहेत. यामध्ये ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) या बहुचर्चित चित्रपटाचा देखील समावेश आहे. अभिनेता आयुष्मान खुराणा (Ayushmann Khurrana) याच्या प्रमुख भूमिकेमध्ये असणार ड्रीम गर्ल (Dream Girl) चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्याने साकारलेले पात्र आणि चित्रपटाची हटके स्टोरी यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता चित्रपटाचा पुढील सिक्विल येणार असून अभिनेता आयुष्मानने ड्रीम गर्ल 2 या चित्रपटाचे पोस्टर आऊट केले आहे.

या पोस्टरमध्ये फक्त अभिनेता आयुष्मान खुराणाचा चेहरा व हात दिसून येत आहे. पोस्टरवरील अभिनेत्याच्या (Dream Girl 2 Poster Out) हावभावाने प्रेक्षकांची मने आधीच जिंकली आहेत. पण त्यापेक्षा लक्षवेधी ठरत आहे ते म्हणजे पोस्टरमध्ये असणारी पडद्यामागची सावली. आयुष्मान खुराणा हा पडद्यामागून डोकावत आहे ज्यामध्ये चेहरा तर आयुष्मानचा आहे मात्र सावली ही स्त्रीची असल्याचे दिसत आहे. स्त्रीच्या शरीराची सावली ही या पोस्टरमधील महत्त्वाची ठरली असून ही सावली प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करत आहे.

‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य (Raaj Shaandilyaa) यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती एकता कपूर
(Ekta Kapoor) हिने केली आहे. 2019 साली प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल मध्ये पूजा हे पात्र महत्त्वपूर्ण ठरले होते.
आधीच्या चित्रपटामध्ये पूजा ही कधीच समोर आली नव्हती. आता मात्र ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये पूजा (Dream Girl 2 Pooja)
हे पात्र प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी पडद्यावर येण्याची शक्यता दिसत आहे.
‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराणा बरोबरच अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh),
अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey), परेश रावल (Paresh Rawal) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना
दिसणार आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट येत्या 25 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला (Dream Girl 2 Release date) येणार आहे.

Raghav And Shehnaaz Gill Affair | राघव व शेहनाजच्या नात्यावर राघवने सोडले मौन; म्हणाला, “मी लग्न केले आहे…

Nushrratt Bharuccha | नुसरत भरुचा रिव्हेलिंग फोटोशूटने नेटकरी अवाक; फोटो व्हायरल