Raghav And Shehnaaz Gill Affair | राघव व शेहनाजच्या नात्यावर राघवने सोडले मौन; म्हणाला, “मी लग्न केले आहे…

पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा म्हणजे डान्सर राघव जुयाल (Raghav Juyal) हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर राघव व अभिनेत्री शेहनाज गील यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्याच्या व्हिडिओमध्ये एकमेंकासोबत घट्ट नाते असलेले दिसून येते. मात्र नेटकऱ्यांनी राघव व शेहनाज (Raghav And Shehnaaz) यांचे अफेअर (Raghav And Shehnaaz Gill Affair) सुरु असल्याच्या अफवा परसवल्या होत्या. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) मृत्यूनंतर शेहनाज गील मुव्ह ऑन झाली असून ती आता राघवला डेट करत असल्याचे बोलले जाते. आत्तापर्यंत राघव व शेहनाज (Raghav And Shehnaaz Gill Affair) यांनी त्यांच्या नात्याबद्दल काहीच बोलले नव्हते. आता डान्सर राघव जुयाल याने मौन सोडले असून त्यांच्या नात्यावर भाष्य केले आहे.

डान्सर व एंकर असलेल्या राघवने एका मुलाखती दरम्यान त्य़ाच्या वैयक्तिक आयुष्य़ाबद्दल सांगितले. मुलाखतीमध्ये राघवला त्याच्या व शेहनाजच्या खास नात्याबद्दल विचारण्यात आले. यावेळी तो म्हणाला की, ‘मी आणि शेहनाजने एका चित्रपटात एकत्र काम केले आहे आणि फक्त एवढेच आहे. लोक सहसा सहकलाकारांबद्दल प्रश्न विचारतात, ही स्वाभाविक गोष्ट आहे, परंतु आम्ही डेटिंग करत नाही. काही महिन्यांत माझे तीन चित्रपट येत आहेत. आणि असे म्हणायला हरकत नाही की मी माझ्या कामाशी लग्न केले आहे. सध्या मला रिलेशनशिपमध्ये यायचे नाही. ना माझ्याकडे त्यासाठी वेळ आहे. माझा अशा कोणत्याही नात्यामध्ये येण्याचा विचार नाही.” अशा शब्दांत राघवने त्याच्या व शेहनाजच्या नात्याबद्दल स्पष्टपणे मत व्यक्त केले आहे.

मुलाखतीमध्ये राघवला सध्या होस्टिंग का करत नाही असे देखील विचारले. याबद्दल मत मांडताना राघव म्हणाला की, डान्स प्लसच्या टीमची मला नक्कीच आठवण येते. मी त्या शो चा अनेक सीजनपासून चेहरा होतो. पण आता पुढे जायला हवे. मी अनेक रिअ‍ॅलिटी शो होस्ट केले आहेत पण आता मला चित्रपटांवर लक्ष केंद्रित करायचे आहे.

राघव जुयाल टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. अनेक रियलिटी शो मध्ये राघवने सहभाग घेतला आहे. तसेच त्याने होस्टिंग देखील केली आहे. राघवने त्याच्या हटके अंदाजमध्ये डान्सच्या रियलिटी शो चे होस्टिंग केले आहे. काही महिन्यांपूर्वी राघव ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सलमान खानच्या (Salman Khan) चित्रपटामध्ये झळकला होता. याच चित्रपटामध्ये शेहनाजने देखील भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतरच शेहनाज व राघवच्या अफेअरच्या (Raghav And Shehnaaz Gill Affair) चर्चांना उधाण आले.

Nushrratt Bharuccha | नुसरत भरुचा रिव्हेलिंग फोटोशूटने नेटकरी अवाक; फोटो व्हायरल

Ranveer Singh And Alia Bhatt | “झुमके मला दे, तुझी वहिनी खूष होईल”; दीपिकासाठी रणवीरने केली आलियाच्या झुमक्यांची मागणी…