डीआरआयने उधळला कोट्यावधी रक्त चंदनाच्या तस्करी डाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

नाव्हाशेवा बंदरावरून मलेशियाला रक्त चंदनाची निर्यात केली जाणार असल्याची गुप्त माहिती महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) मिळाली होती. त्यानुसार एका कंटेनरची डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यामध्ये ४ कोटी ५२ लाख रुपयांचे रक्त चंदनाचे लहान आकाराचे ओंडके सापडले. इम्पोर्ट एक्स्पोर्ट पॉलिसीअंतर्गत अशा प्रकारे रक्त चंदनाची निर्यात करणं निषिद्ध आहे. डीआरआयने कोटींच्या रक्त चंदन तस्करीचा डाव उधळून लावला आहे.
[amazon_link asins=’B00JJIDBIC,B00B3QKQ40′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ee99713a-b1f4-11e8-a9bc-8be99a7703f9′]

या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे उघड झाले आहे. कस्टम ऍक्ट १९६२ च्या कलम १०४ अन्वये या तस्करीत सामील असलेल्या एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. चीन आणि जपानसारख्या देशात फर्निचर आणि पारंपरिक आशियाई औषध बनविण्यासाठी रक्त चंदनाची खूप मागणी आहे.

निर्यात कागदपत्रात पॉलिस्टर धाग्याचे १८.५२२ एमटीज वजनाचे ६४८ कार्टून्स असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, कंसाइन्मेंट उघडून पहिले असता ९ हजार ४० किलो वजनाचे वेगवेगळ्या आकाराच्या लाकडी ओंडक्यांना पॉलिस्टर धाग्याने गुंडाळून लपविण्यात आले होते. कोणाला संशय येऊ नये यासाठी तांदळाच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like