Driving License-PAN Download on Whatsapp | व्हाट्सअपवर डाउनलोड करता येणार ड्रायव्हिंग लायसन्स, PAN; एका SMS मुळे होईल काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Driving License-PAN Download on Whatsapp | इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून (Ministry of Electronics and Science Technology) व्हाट्सअप (Driving License-PAN Download on Whatsapp) वापरकर्त्यासाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मंत्रालयाने खास सुविधा सुरू केली आहे. नव्या निर्णयानुसार, केवळ एका व्हाट्सअप मेसेजच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License), पॅन कार्ड (PAN Card) आणि आरसी (RC) यासारखे महत्त्वाचे कागदपत्रे (Documents) डाऊनलोड करता येणार आहेत. सरकारकडून डिजिलॉकर (Digilocker) सर्व्हिसला अ‍ॅक्सेस करण्यासाठी MyGov Helpdesk ला व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध केलेय. याचा अर्थ केवळ एका क्रमांकावर Whatsapp मेसेज सेन्ड करुन डिजीलॉकर सर्व्हिस वापर करू शकणार आहात.

 

MyGov हेल्पडेस्क मार्च 2020 रोजी सुरू केले होते. कोरोनाच्या महामारीत या हेल्पडेस्कने नागरिकांना कोरोनाशी संबंधित माहिती देण्यापासून, लस बुकिंगची सुविधा, प्रमाणपत्र डाउनलोड करण्यापर्यंत खूप मदत करण्यात आली आहे. आजपर्यंत 80 मिलियनहून जादा लोकांनी हेल्पडेस्कवर अ‍ॅक्सेस केला आहे आणि 33 मिलियनहून अधिक लस प्रमाणपत्रे डाउनलोड केली आहेत. (Driving License-PAN Download on Whatsapp)

‘हे’ डॉक्युमेंट्स डाउनलोड करता येणार –

– पॅनकार्ड

– ड्रायव्हिंग लायसन्स

– सीबीएसई 10 वी पास सर्टिफिकेट

– RC बुक

– विमा पॉलिसी – दुचाकी

– 10 वीचे मार्कशीट

– 12 वीचे मार्कशीट

– विमा पॉलिसी डॉक्युमेंट्स (Digilocker वर उपलब्ध जीवन आणि गैर-जीवन)

 

Whatsapp द्वारे डॉक्युमेंट्स डाउनलोड करण्याची प्रक्रिया –

– यासाठी तुम्हाला फक्त +91 9013151515 नंबरवर Namaste किंवा Hi किंवा Namaste लिहून पाठवावे लागेल.

– यानंतर तुम्हाला DigiLocker अकाउंट किंवा Cowin सर्व्हिस अ‍ॅक्सेस करायचे की नाही हे विचारले जाईल.

– DigiLocker निवडल्यावर तुम्हाला विचारले जाईल की खाते आहे की नाही.

– जर DigiLocker वर तुमचे आधीच अकाउंट असल्यास, तुमचा आधार नंबर टाका.

– तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तो एंटर करा.

– आता तुम्ही जी काही कागदपत्रे आधीच अपलोड केली आहेत, ती तुम्ही येथून डाउनलोड करू शकता.

 

Web Title :- Driving License-PAN Download on Whatsapp | now downloaded driving license (DL) and pan card on whatsapp new digilocker feature arrived

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Water Supply Closed In Pune City | गुरूवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार; शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा

 

Bank Holidays June-2022 | जून महिन्यामध्ये 12 दिवस बँका बंद राहणार; सुट्ट्यांची संपूर्ण यादी पहा

 

Best Stocks to Buy | काही काळातच मोठा रिटर्न मिळवण्यासाठी ‘या’ 7 शेयरवर लावू शकता डाव, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला