Drowning In Bhima River | पुण्यातील दुर्दैवी घटना ! गुऱ्हाळावर काम करणाऱ्या 3 परप्रांतिय मुलांचा भीमा नदीत बुडून मृत्यू

दौंड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Drowning In Bhima River | दौंड तालुक्यातील हातवळण येथील भीमा नदीतमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या सहा पैकी तीन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 7) दुपारच्या सुमारास घडली आहे. मृत तरुण परराज्यातील असून ते हातवळण येथील गुऱ्हाळावर काम करत होते. यावेळी स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांनी शोध घेऊन एका मुलाचा मृतदे बाहेर काढला. मात्र, दोघांचा तपास लागला नाही. त्यानंतर आज सकाळपासून पाटस पोलीस व ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरु केली. (Drowning In Bhima River)

सकाळी दहाच्या सुमारास नदीमध्ये दोन्ही मुलांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. एकाचा मृतदेह हातवळण तर दुसरा कानगाव हद्दीत सापडला. विशाल दिलेराम सिंग (वय-16), निखिल नरेशसिंग कुमार (वय-15) व अमित रामेश्वर राम (वय-16 मुळ रा. आदवपुर जि. बिजनौर) अशी या मुलांची नावे आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही मुले हातवळण येथील वसंत फडके यांच्या गुऱ्हाळावर काम करत होती. (Drowning In Bhima River)

शनिवारी दुपारी हातवळण येथील नदी पात्रात पोहण्यासाठी सहाजण गेले होते.
मात्र, यामधील तीन जण नदीच्या पात्रात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच भीमा नदीच्या पात्रात यवत व पाटस पोलिसांनी धाव घेतली.
पोलिसांनी व मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनी व ग्रामस्थांनी होडीतून मुलांचा शोध सुरु केला.
मात्र बराच वेळ शोध घेतल्यानंतर अमित याचा मृतदेह आढळून आला. तर रविवारी विशाल आणि निखिल यांचा मृतदेह सापडला.
मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी पाटस पोलीस ठाण्याचे (Patas Police Station)
सहायक पोलीस निरीक्षक संजय नागरगोजे (API Sanjay Nagargoje) आणि ग्रामस्थ उपस्थित होते. (Pune Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole On INDIA Aghadi | कसबा निवडणुकीने दाखवून दिले की, जनतेचा कौल भाजपाच्या विरोधात – नाना पटोले