औषधांचा तुटवडा असल्याची गिरीश बापट यांची कबुली

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याची कबुली औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. लवकरच त्रुटी दूर करून मार्ग काढला जाईल. राज्यातील औषध पुरवठ्याचे काम आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आणि त्यानंतर ते औषध प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले आहे. २६० कोटी रुपयांच्या निविदा मान्य करण्यात आल्या आहेत. १५० कोटी रुपयांच्या निविदा आणखी तयार करण्याचे काम सुरू आहे. वितरणच्या पद्धतीत काही दोष आढळून आले आहेत, असे बापट म्हणाले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92345196-d0f4-11e8-bb24-6127a0e98982′]

शासकीय रूग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा भासत असताना भाजपने सर्वत्र सवौपचार शिबीरांचा धडका लावला आहे. हा प्रकार पत्रकारांनी औरंगाबाद येथे बापट यांच्या निदर्शनास आणून दिला असता बापट म्हणाले, राज्यातील बहुतांश सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याने हे काम अलीकडेच औषध प्रशासनाकडे देण्यात आले आहे. हाफकिन इन्स्टिट्य़ूटकडे पुरवठ्याचे काम दिले असल्यामुळे तेथे जाऊन याबाबतची बैठक घेतली होती. काही प्रमाणात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. पण औषध वितरणामध्ये त्रुटी आहेत. त्यावर मात करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. येत्या महिनाभरात कार्यवाही पूर्ण होईल. लातूर येथे अलीकडेच भाजपच्या वतीने आरोग्य शिबिर घेण्यात आले.

[amazon_link asins=’B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’99b8c1bb-d0f4-11e8-9d4a-15472c7bc469′]

त्यात अनेक रुग्णांची तपासणी झाली. सरकारी पातळीवर औषधांचा तुटवडा असतानाही आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघावे. या शिबीरांचा रुग्णांना फायदा होत असतो. एखाद्या जिल्ह्य़ात एखाद्या पालकमंत्र्याला किंवा स्वयंसेवी संस्था वा एखाद्या पक्षाला असे शिबिर घ्यावेसे वाटत असेल, तर सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होत असल्याने त्याकडे चांगल्या नजरेने बघावे. आजही हाफकिनच्या कार्यकारी समितीवर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचेच नाव आहे. हाफकिनच्या कार्यकारी मंडळावर तसेच अन्य समित्यांवर मी नाही, असे बापट म्हणाले.

पंतप्रधान मोदी १९ ऑक्टोबरला शिर्डीमध्ये