Drug Smuggling Through Sanitary Pads | सॅनिटरी पॅडमधून अंमली पदार्थांची तस्करी, मुंबई विमानतळावर 5.68 कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Drug Smuggling Through Sanitary Pads | अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन महिलांनी चक्क त्यांच्या सॅनिटरी पॅड मधून कोकेन लपून आणल्याचा प्रकार मुंबई विमानतळावर उघडकीस आला आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (DRI) अधिकाऱ्यांनी या तस्करीचा पर्दाफाश केला असून या तस्करांच्या या नव्य पद्धतीमुळे अधिकारी देखील चक्रावले आहेत. तसेच तिसऱ्या प्रकणामध्ये एका महिलेने गुद्वारात अंमली पदार्थ लपवून आणले होते. या तिनही महिलांना अटक केली आहे. (Drug Smuggling Through Sanitary Pads)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युगांडा येथील दोन महिला अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याची
माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. या महिला परदेशातून मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांच्या सामानाची
तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या सामानामध्ये काहीही आढळून आले नाही.
परंतु, त्यांची सखोल तपासणी केली असता त्यांच्या सॅनिटरी पॅड मध्ये कोकेन असल्याचे आढळून आले. (Drug Smuggling Through Sanitary Pads)

दुसऱ्या घटनेमध्ये टांझानिया देशातील महिला मुंबईत अंमली पदार्थाची तस्करी करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. तिची देखील सखोल तपासणी केली असता तिने गुद्वारामध्ये कोकेन लपवल्याचे आढळून आले.
मागील तीन दिवसांमध्ये डीआरआयने तस्करांकडून 568 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. जप्त केलेल्या कोकेनची
आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 5 कोटी 68 लाख रुपये एवढी आहे. (Mumbai Crime News)

आजवर बॅगेत पट्ट्या लपवून किंवा अंमली पदार्थांच्या गोळ्यांचे सेवन करून त्याद्वारे तस्करी करण्याच्या घटना
उजेडात आल्या होत्या. मात्र, आता या नव्याने समोर आलेल्या तस्करीच्या कार्यपद्धतीमुळे अधिकारी देखील चक्रावून गेले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Inspector Promotion ACP / DySP | राज्यातील 104 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उपअधीक्षक पदी बढती