Drugs Racket | नाशिक शिक्षण विभागाचा धक्कादायक फतवा, ‘त्या’ ड्रग्ज रॅकेटविरोधी मोर्च्यात विद्यार्थी सहभागी झाले तर कारवाई करणार

नाशिक : नाशिक शहरात ड्रग्ज अंमली पदार्थ गुन्हेगारी वाढली असून या रॅकेटविरोधात (Drugs Racket) शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena Thackeray Group) मोर्चा काढला जाणार आहे. धक्कादायक म्हणजे या मोर्चात (Drugs Racket) विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये असा फतवा नाशिक शिक्षण विभागाने (Nashik Education Department) काढला आहे. यासाठी रितसर पत्रक काढण्यात आले आहे.

विद्यार्थी मोर्च्यात सहभागी झाले तर मुख्याध्यापक आणि प्राचार्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाने (Nashik Zilla Parishad Education Department) आपल्या पत्रकात दिला आहे. तर दुसरीकडे मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन ठाकरे गटाने विद्यार्थ्यांना केले आहे.

नाशिक शहरातील ड्रग्ज रॅकेट (Drugs Racket), अंमली पदार्थाचे सेवन, वाढती गुन्हेगारी, रोलेट, बिंगोचे, जुगाराचे अड्डे, पोलिसांची निष्क्रियता, या विरोधात आज ११ वाजता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येत आहे. शालिमारमधील शिवसेना मध्यवर्ती कार्यलयात, संत गाडगेबाबा पुतळा, मेनरोड, रविवार कारंजा, चॠ रोड, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार आहे.

विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात येऊ नये अशा आशयाचे एमआयएम पक्षाने प्रशासनाला निवेदन दिले होते.
त्याच निवेदनाची दखल घेऊन हे पत्रक काढण्यात आले आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil), भूषण पाटील (Bhushan Patil), अभिषेक बलकवडे
(Abhishek Balakwade) यांनी नाशिक शहरात ड्रग्जचा कारखाना सुरू केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
मुबंई (Mumbai Police), पुणे पोलीस (Pune Police) नाशिकमधे येऊन कारवाई करत आहेत.
मात्र, याबाबत नाशिक पोलीसांना (Nashik Police) काहीही माहीती नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दुसरीकडे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचेही ड्रग्ज प्रकरणात नाव पुढे आल्याने राजकीय
वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासाठी आज शिवसेना मोर्चा काढणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil Pune | आज पुण्यात मराठा एल्गार! मनोज जरांगे यांची तोफ खेड, बारामतीमध्ये धडाडणार