Manoj Jarange Patil Pune | आज पुण्यात मराठा एल्गार! मनोज जरांगे यांची तोफ खेड, बारामतीमध्ये धडाडणार

पुणे : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil Pune) आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांच्या विविध ठिकाणी सभा आणि भेटीगाठींचा कार्यक्रम होणार आहे. शिवाय, खेड राजगुरुनगर आणि बारामतीमधील सभांमध्ये जरांगे यांची तोफ धडाडणार आहे. जरांगे (Manoj Jarange Patil Pune) यांच्या लाखोंच्या सभांचा सत्ताधारी पक्षांनी धसका घेतला असून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आज पुण्यातील सभांमध्ये जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील मनोज जरांगे यांच्या सभांना लाखो मराठे हजेरी लावणार आहेत. सत्ताधारी पक्षांनी कोंडी करण्याचा प्रयत्न चालवल्याने मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला २४ ऑक्टोबरपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. मात्र त्यापूर्वीच जरांगे पाटलांनी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.

जरांगे (Manoj Jarange Patil Pune) यांच्या पुण्यातील सभांसाठी मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. या सभेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा क्रांती मोर्चातर्फे ५ लाख मराठा बांधव राजगुरुनगर येथील सभेला येणार असल्याचा अंदाज आहे.
१०० एकर जागेवर ही सभा होणार आहे. या जागेची पाहणी मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha)
समन्वयक आणि पोलिसांनी केली. सभेला येत असलेल्या लोकांची सर्वप्रकारची काळजी घेतली जाणार आहे.

जरांगे पाटलांचा आजचा दौरा

  • सकाळी ७ वाजता किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रतिमेला अभिवादन.
  • सकाळी १० वाजता जुन्नरला भव्य स्वागत.
  • सकाळी ११ वाजता खेड राजगुरुनगरमध्ये सभा.
  • दुपारी ३ वाजता बारामतीच्या तीन हत्ती चौकात सभा.
  • सायंकाळी ५ वाजता फलटण आणि त्यानंतर रात्री ८ वाजता दहिवडीत भेट.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitesh Rane | ससून ड्रग्ज प्रकरणी नितेश राणेंचा गंभीर आरोप,
”ड्रग्ज माफियाचा सर्वात जवळचा मोठा मित्र मातोश्रीवर”