DSK Builder Case | 32 हजार ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक ! बिल्डर डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णींचा जामीनासाठी अर्ज

पुणे (DSK Builder Case) : पोलीसनामा ऑनलाइन देशभरातील ३२ हजारहून अधिक ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (DSK Builder Case) यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी shirish kulkarni यांनी जामीन मिळावा, यासाठी येथील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांनी जामीनासाठी केलेला हा पहिलाच अर्ज आहे. Builder DSK’s son Shirish Kulkarni’s application for bail

गुन्हा दाखल झाल्यानंतर शिरीष कुलकर्णी shirish kulkarni यांनी अटकपुर्व जामीनासाठी anticipatory bail अर्ज केला होता.
त्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांना पोलिसांत हजर होण्याच्या सुचना केल्या होत्या.
त्यानुसार ते २५ जून २०१८ रोजी पोलिसांत हजर झाले होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

या प्रकरणात डीएसके (DSK Builder) यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद कुलकर्णी, पुतणी, जावई यांच्यासह इतर अनेकांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्यावर एमपीआयडी, फसवणूकसह विविध कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
शिरीष कुलकर्णी यांनी त्याचे वकील आशिष पाटणकर आणि ॲड. प्रतीक राजोपाध्ये यांच्या मार्फत जामिनाचा अर्ज दाखल केला आहे.
त्यावर २४ जून रोजी सरकारी वकील आपले म्हणणे सादर करणार आहेत.

बंधू मकरंद कुलकर्णी यांच्यासह काहींना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे.
तर डीएसके दांपत्यांचा जामीन नाकारण्यात आला होता.
कर्जाची परतफेड केली नाही म्हणून तुम्हाला दिवाळखोर का जाहीर करू नये, अशी कारणेदाखवा नोटीस सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने शिरीष कुलकर्णी यांना जानेवारी २०१९ साली पाठवली होती.
त्यावर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे.
संबंधित याचिका अद्याप प्रलंबित आहे.
जोपर्यंत याचिकेवर प्रत्यक्ष सुनावणी होऊन आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही.
तोपर्यंत त्यांना दिवाळखोर जाहीर करू नये, अशी नोटीस बचाव पक्षाने सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाला बजावली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : DSK Builder Case | Builder DSK’s son Shirish Kulkarni’s application for bail

Swargate Police Station |अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी