Dustin Diamon Death : डस्टिन डायमंडचं ‘कॅन्सर’मुळं निधन ! 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पोलिसनामा ऑनलाईन – अमेरिकेचा प्रसिद्ध अ‍ॅक्टर डस्टिन डायमंड (Dustin Diamond) याचं सोमवारी निधन झालं. कॅन्सरमुळं अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतला. सेव्ड बाय द बेल सारख्या हिट सीरिजचा प्रसिद्ध अभिनेता अशा प्रकारे अचानक गेल्यानं हॉलिवूडला धक्का बसला आहे.

त्याच्या एजंटनं सांगितलं की, अलीकडेच झालेल्या एका तपासातून हे समोर आलं आहे की, डस्टीन अॅग्रेसिव कॅन्सरशी लढत होता. यानंतर अवघ्या तीन आठवड्यात त्याचं निधन झालं. हा खतरनाक आजार त्यांच्या शरीरात खूप वेगानं पसरत होता.

डस्टीनचे एजंट रॉजर पॉल यांनी सांगितलं की, हा आजार त्याला दीर्घकाळ सोसावा लागला नाही. त्याला याचा जास्त त्रास झाला नाही ही एक दिलासादायक बाब आहे.

डस्टिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कॅलिफोर्नियाच रहिवाशी डस्टिन यानं गुड मॉर्निंग मिस ब्लिस मधून करिअरला सुरुवात केली होती. स्क्रीच ही त्याची भूमिका अमेरिकेसह परदेशातही खूप पसंत केली गेली. परंतु या शोनंतर त्याला अपेक्षे प्रमाणे यश मिळालं नाही. सेव्ड बाय द बेल चे स्पीनऑफ आणि दुसऱ्या टीव्ही शोज व्यतिरीक्त डस्टीन लहान भूमिकेतच दिसला.