#Video : ‘द रॉक’ने ‘त्याच्या’वर केले कुर्‍हाडीने वार, पुढे झाले ‘असे’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूडमधील प्रसिद्ध सिरीज फास्ट अँड फ्युरियसच्या आठही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धमाल दाखवली आहे. तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो की, लवकरच फास्ट अँड फ्युरियसचा 9 वा पार्ट येणार आहे. हॉब्स अँड शॉ अस या पार्टचं नाव आहे. या सिनेमाची शुटींगही सुरु करण्यात आली आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो की, हॉब्स अँड शॉमध्ये ल्यूक हॉब्सची भूमिका साकारत आहे प्रसिद्ध अभिनेता ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson) म्हणजेच द रॉक. तुम्हाला सांगू इच्छितो की, रॉकने नुकताच त्याच्या इंस्टावरून या सिनेमातील एक सीन शेअर केला आहे. सध्या रॉकचा हा व्हिडीओ सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांना हा सीन खूप आवडल्याचे दिसत आहे. चाहते वारंवार हा व्हिडीओ पाहत आहेत. या व्हिडीओत द रॉक म्हणजे ड्वेन जॉनसन खूपच आक्रमक दिसत आहे. सोबतच तु्म्ही पाहू शकता की, ड्वेन कुऱ्हाडीने कोणाला तरी मारत आहे. हा सीन खूपच भयानक वाटत आहे.

 

ड्वेनच्या व्हिडीओत दिसत आहे की, ड्वेन आपल्या स्टंटमॅनसोबत सिनेमातील अॅग्रेसीव सीनची प्रॅक्टीस करताना दिसत आहे. हा व्हिडीओला ड्वेनने खास कॅप्शन देत सीनबद्दल माहिती दिली आहे. ड्वेनच्या या व्हिडीओला 1 कोटी 55 लाख व्हयुज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ड्वेन अॅक्शन फिल्मसाठी खूपच फेमस अभिनेता आहे. मुख्य म्हणजे हा सीन जास्त हिंसक वाटत असल्याने रेटींग बोर्डने हा सीन दाखवण्यास मनाई केली आहे. त्यामुळे हा सीन सिनेमातून काढण्यात आला होता. असं ड्वेनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त – 

अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

हे दोन पदार्थ टाळा ; अन्यथा ‘स्नायू’ होतील कमजोर