e-Search Report Maharashtra | ऑनलाइन मिळकतींचा शोध (ई-सर्च रिपोर्ट) घेण्याची सुविधा पुन्हा सुरू
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – e-Search Report Maharashtra | मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार करताना संबंधित मालमत्तेबाबतचे तपशील तपासण्यासाठी वापरण्यात येणारी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ई-सर्च रिपोर्ट (ऑनलाइन मिळकतींचा शोध) घेण्याची सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा गेले काही दिवस बंद होती किंवा मिळकतींचा शोध घेताना नागरिकांना अडचणी येत होत्या. (e-Search Report Maharashtra)
मालमत्ता खरेदी करण्यायोग्य आहे किंवा कसे, संबंधित मालमत्तेबाबत काही कायदेशीर वाद तर नाहीत ना?, याकरिता शोध अहवाल काढला जातो. गेल्या काही दिवसांपासून (ई-सर्च रिपोर्ट) या सुविधेत तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. हा बिघाड दूर करण्यात आला आहे. (e-Search Report Maharashtra)
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या (Registration and Stamp Duty Department) ऑनलाइन प्रणालीमध्ये (Metadata) जुन्या मिळकतींची माहिती संकलित असून ती माहिती वेगळी करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे काही प्रमाणात समस्या येत होती. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) स्तरावर काम करून माहिती तंत्रज्ञान विभागातील पाच तज्ज्ञांचे पथक देखील मुख्यालयात दाखल झाले होते. परिणामी सध्या या सुविधेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून ही ऑनलाइन ई-मिळकत शोध सुविधा सुरळीत करण्यात आली असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, खरेदी-विक्री व्यवहारात एजंटांकडून फसवणूक होऊ नये, खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत आणि पारदर्शकपणे होण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बहुतांश सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार मिळकतीचा इतिहास तपासण्यासाठी विभागाने ऑनलाइन मिळकत शोध सुविधा देखील सुरू केली आहे. यामध्ये सन २००२ नंतरच्या सर्व मिळकतींच्या व्यवहारांची माहिती प्राप्त करता येते. मिळकतीच्या नकाशापासून त्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या परवानग्या आहेत किंवा कसे, अकृषक परवाना काढला आहे किंवा कसे, अधिकृत बांधकाम परवानगी घेतली आहे का, मिळकतीचा प्रथम मालक कोण, खरेदी व्यवहार, मिळकतीवर असणारा बोजा, त्या मिळकतीचे झालेले खरेदी-विक्री व्यवहार, मिळकतीतील भागीदार आदींची माहिती या मिळकत शोध सुविधेतून प्राप्त करता येते. गेल्या काही दिवसांपासून या सुविधेत काही तांत्रिक अडचणी येत होत्या. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या पातळीवर हा बिघाड दुरुस्त करून ऑनलाइन मिळकत शोध सुविधा पुवर्वत करण्यात आली आहे.
मिळकतींचा ऑनलाइन शोध घेण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यात आल्या असून ही सेवा पुर्ववत करण्यात आली आहे.
राज्यात सन २००२ नंतरच्या सर्व मिळकतींच्या व्यवहारांची माहिती ऑनलाइन मिळेल,
तर मुंबई आणि उपनगरांमध्ये सन १९८५ पासूनचे दस्त एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मात्र, जे दस्त काही कारणांनी स्कॅन झालेले नाहीत, ते ऑनलाइन दिसणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घेण्याची गरज आहे.
– श्रावण हर्डीकर, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (IAS Shravan Hardikar)
Web Title :- e-Search Report Maharashtra | The facility of online income search (e-search report) has resumed
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Adani Group | NDTV मध्ये अतिरिक्त 26 टक्के भागीदारीसाठी 17 ऑक्टोबरला ओपन ऑफर आणणार अदानी ग्रुप
Pune Pimpri Crime | तडीपारीचा खर्च म्हणून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करत मागितली खंडणी