Ear Wax | पेन्सिल किंवा लोखंडाने कान स्वच्छ करणे धोक्याची घंटा, जाणून घ्या ईयर व्हॅक्स काढण्याची योग्य पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ear Wax | कान हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे जो आपल्याला ऐकण्याची क्षमता देतो, त्यामुळे त्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तरीही अनेकजण कान स्वच्छ करण्याच्या नावाखाली त्याच्या आरोग्याशी खेळताना दिसतात. कानातले व्हॅक्स म्हणजेच मळ अजिबात काढू नये असे नाही, पण खबरदारी घेणेही खूप गरजेचे आहे. (Ear Wax)

 

ईअर वॅक्सचे फायदे
ईअर वॅक्स (Ear Wax) मध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात जे कान स्वच्छ करण्यास मदत करतात, ते कानाचे संरक्षण करते आणि ते कोरडे होऊ देत नाही. जेव्हा जोरदार धूळ उडते, तेव्हा हे कानातले मेण असते जे घाण कानात जाण्यापासून प्रतिबंधित करते. याशिवाय जेव्हा आपण पोहतो किंवा आंघोळ करतो तेव्हा ते आपल्या कानात पाणी जाऊ देत नाही.

 

टोकदार वस्तूंनी कान करू नका स्वच्छ
कानातले व्हॅक्स काढताना अनेकजण लाकूड, लोखंड किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरतात, त्याचे अनेक तोटे होतात. असे केल्याने कानातील व्हॅक्स बाहेर येण्याऐवजी आत जातो.

 

तसेच संसर्गाचा धोका वाढतो. सर्वात मोठा तोटा म्हणजे तीक्ष्ण वस्तूंमुळे कानाचा पडदा (Eardrum) फाटू शकतो आणि ऐकण्याची क्षमता देखील नष्ट होऊ शकते.

कान कसे स्वच्छ करावे?
इयरवॅक्स कानांना हानी पोहोचवत नाही, म्हणून सहसा ते बाहेर काढण्याची गरज नसते. जर कान खूप मेणाने भरलेले असतील, ऐकण्याच्या समस्या सुरू झाली असेल, तर स्वत:च साफसफाई करू नका आणि त्वरित कान तज्ञाशी संपर्क साधा.

 

ईअरबड्स वापरणे किती सुरक्षित?
कान स्वच्छ करण्यासाठी तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नये हे बहुतेकांना माहिती आहे,
मग कॉटन इअर बड्स (Cotton Ear Buds) किती सुरक्षित आहेत? आरोग्य तज्ज्ञांच्या मते,
यामुळे समस्या दूर होण्याऐवजी कानात जखमा होण्याचा धोका असतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Ear Wax | ear cleaning risk with sharp object like pencil or iron steel is dangerous how to remove ear wax

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NEET Exam 2022 | ‘नीट’ परीक्षा 17 जुलैला होणार; प्रवेशपत्र जारी, जाणून घ्या

 

Gold Silver Price Today | गुरुपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली; जाणून घ्या आजचे दर

 

Ranjitsinh Disale | जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसलेंनी दिला राजीनामा