Budget 2019 : भारताला आर्थिक ‘महासत्‍ता’ बनविण्यासाठी मोदी सरकारचा ‘हा’ मास्टर प्लॅन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदींनी मागील आठवड्यात जी-२० मध्ये संपूर्ण जगाला सांगितले की, भारत ५ लाख कोटी डॉलरची आर्थिक महाशक्ती आहे आणि वेगाने वाढत आहे. तसेच या संबंधित ब्ल्यू प्रिंटची माहिती आर्थिक सर्वेक्षणात देण्यात आली. मुख्य आर्थिक सल्लागार केवी सुब्रमण्यम यांनी संगितले की, पुढील ५ वर्षापर्यंत दरात ८ टक्क्याने वृद्धी होईल आणि भारत ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. यात काय काय समस्या येतील हे देखील त्यांनी सांगितले.

भारत असा बनेल आर्थिक महासत्ता –

आर्थिक सर्वेक्षणात सांगण्यात आले की, हे लक्ष २०२५ पर्यंत गाठण्यासाठी भारताला ८ टक्के वार्षिक वृद्धीची आवश्यकता आहे. सुब्रमण्यम यांनी वित्त वर्ष २०२० साठी ७ टक्के विकास दर असेल असा अंदाज बांधला आहे.

अर्थव्यवस्थेत होणार सुधार –

आर्थिक सर्वेक्षणामध्ये सांगण्यात आले आहे की, गुंतवणूकीचा स्तर कमी झाला आहे. परंतू यात सुधार होण्याचे संकेत आहेत. २०२० मध्ये गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. चांगल्या आर्थिक प्रदर्शनाची शक्यता आहे.

५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे. त्यामुळे धोरणात आवश्यक ते बदल करणे आवश्यक आहे. चीनचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, बचत आणि गुंतवणूकीवर अनेक बाबी निर्भर आहेत. गुंतवणूक दर आणि बचत दर २०१७ मध्ये जीडीपीच्या जवळपास ४५ टक्क्यांपर्यंत पोहचला होता.

काँग्रेसचे आमदार अमिता चव्हाणांच्या मतदार संघातच काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

भटक्या विमुक्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा !

धक्कदायक : बौद्धांना मदत केल्यास १०हजार रु. दंड ठोठवणार, गावात दवंडी देत जातीयवाद्यांनी टाकला बहिष्कार

ग्रामीण भागातील शेतकरी, दलित, अदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा- दिनकर पावरा

You might also like