आएनएक्स मीडिया प्रकरण : कार्ती चिदंबरम यांची ५४ कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पूत्र कार्ती चिदंबरम याची ५४ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने  जप्त केली आहे. मनी लाँडरिंग कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली . कार्ती यांची देशातील नवी दिल्ली, उटी, तामिळनाडूतील कोडईकनाल येथील बंगले तसेच विदेशातील ब्रिटन आणि स्पेन येथील मालमत्ता जप्त केली आहे.

सीबीआयने नोंद केलेल्या एफआयआर नुसार ईडीने मनी लाँडरिंग कायद्याखाली ही कारवाई केली आहे. कार्ती याची ब्रिटनमधील कॉटेस आणि घर आणि स्पेनमधील बार्सिलोना येथील टेनिस क्लबची मालमत्ता जप्त केली असल्याची माहिती ईडीने दिली आहे.
[amazon_link asins=’B07C8KJBRY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2f7939c9-cd33-11e8-9b06-cdd97aa8ab9d’]
तसेच कार्ती याच्या ॲडव्हाटेज स्टॅटेजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड (एएससीपीएल) च्या नावाने बँकेतील ९० लाख रुपयांची कायम ठेव रक्कम देखील जप्त केली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार एफआयपीबीची परवानगी घेता ४.६२ कोटींऐवजी ३०५ कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक आयएनएक्स मीडियात करण्यात आली. एफआयपीबीने आयएनएक्सकडे खुलासा मागितल्यानंतर येथे कार्तीचा संबंध येण्यास प्रारंभ झाल्याचा आरोप सीबीआयने केला.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’861fa5e9-cd32-11e8-abd1-e74d9124eda7′]
काय आहे प्रकरण

कार्ती चिदंबरमवर आयएनएक्स मीडियाप्रकरणी ३.५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मॉरिशसकडून गुंतवणूक स्वीकारताना फोरेन इनव्हेस्टमेन्ट प्रमोशन बोर्ड(एफआयपीबी)च्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचा आयएनएक्स मीडियावर आरोप आहे. मात्र, आयएनएक्‍स मीडिया निधीला एफआयपीबी अंतर्गत मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी पी. चिदंबरम हे संबंधीत विभागाचे मंत्री होते. मुलाच्या कंपनीला फायदा मिळावा म्हणून अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी ही मंजुरी दिल्याचा तसेच आयएनएक्सला एफआयपीबीसाठी मदत करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप कार्तीवर करण्यात आला होता.
[amazon_link asins=’B078M16N8P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8cdecafd-cd32-11e8-b56d-b53dfa508cfc’]
आएनएक्स मीडिया प्रकरणी  सीबीआयनं कार्ती चिदंबरम यांना २८ फेब्रुवारी रोजी चेन्नईमधून अटक केली होती. पीटर व इंद्राणी मुखर्जी यांच्या आएनएक्स मीडियाकडून आर्थिक लाभ पदरात पडल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. आएनएक्स मीडियाप्रकरणी ईडी आणि सीबाआयने यापूर्वी अनेकवेळा कार्ती चिदंबरमच्या मालमत्तांवर छापे मारले होते.