ED नं 1 हजार 340 रूपये दिले नाहीत, अ‍ॅड. असीम सरोदेंनी पाठवली नोटीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात ईडीच्या नोटिसने भल्याभल्यांची झोप उडविलेली असताना आता ईडीलाच “नोटीस” बजावण्यात आली आहे. पुण्यातील अ‍ॅड असीम सरोदे यांच्या वतीने नोटीस बजावली आहे. ईडीच्या सांगण्यानुसार सरोदे यांनी एकनाथ खडसे यांच्या खटल्यासंबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स काढून देण्यासाठी ठेवल्या होत्या. पण त्या न नेता त्याचे झालेले 1 हजार 340 रुपये बिल दिले नाही. त्याबाबत ही नोटीस आहे.

तक्रादार अंजली दमानीया यांचे वकील अ‍ॅड. असीम सरोदे यांना ईडीच्या कार्यालयातून ईमेल व फोन आला होता. त्यांना ईडीने खडसे यांच्या विरोधातील न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणाची कागदपत्रे वजा माहिती मागितली होती. त्यानुसार अ‍ॅड. सरोदे यांनी ईडीच्या मागणीला सहमती दर्शवत कागदपत्रे देण्याचे मान्य केले होते. परंतु, येणार्‍या झेरॉक्सचा खर्च ईडीचे द्यावा असे त्यांनी त्यांच्या ईमेलमध्ये म्हटले होते. तसेच ईडीचे अधिकारी राजेश कुमार यांना ईमेलद्वारे उत्तर देताना त्यांना ईडी ही देशातील आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणारी मोठी यंत्रणा आहे. परंतु, राजकीय पक्ष ईडीचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करत असल्याची नाराजी अ‍ॅड. सरोदे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, त्यांनी ईडीच्या अधिकार्‍यांनी मागणी केल्यानुसार 1350 पाने झेरॉक्स करून ठेवले होते. त्यानुसार ईडीचा एक प्रतिनिधी हा अ‍ॅड. सरोदे यांच्या कार्यालयात आला. परंतु, त्या आलेल्या व्यक्तीने ते कोठेही ईडीमध्ये काम करत नसल्याचे त्या अधिकार्‍याने सांगितले. त्या व्यक्तीनेही ईडीला मदत करण्यासाठी कागदपत्रे घेण्यासाठी आलो असल्याचे ती व्यक्ती म्हणाली. मोबाईलवर फोन लाऊन ती व्यक्ती फोनवर बोलत बोलतच माध्यम प्रतिनिधींना पाहून नाराज झाली. तसेच कागदपत्रे न घेताच बाहेर पडली होती. त्यामुळे ईडीच्या सांगण्यानुसार झेरॉक्स काढूनही पैसे न देण्यात आल्याने ही नोटीस बाजवण्यात आली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्याची बेजबाबदरी

2005 पासून ईडी ही तपास यंत्रणा कार्यरत असून आतापर्यंत केवळ आठ प्रकरणात आतापर्यंत शिक्षा झाली आहे. त्यामुळे ईडीत प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज असल्याची खंत नोटिशी मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

प्रकरण…

भोसरीतील भुखंड प्रकरणात सध्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) नोटीस बजावली होती. त्यानंतर खटल्यासंबंधी कागदपत्रे मिळविण्यासाठी व पुराव्यांची अधिक जुळवा जुळव करण्यासाठी ईडीने अ‍ॅड. असिम सरोदे यांच्याकडे कागदपत्रे मागितले होते. त्यानुसार या झेरॉक्स काढल्या होत्या.