ED | शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ यांच्यासह मुलगा आणि जावयाच्या कार्यालये, निवासस्थानावर ईडीचे छापे

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – ED | मुंबईतील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ED) अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचा माजी आमदार मुलगा व जावई यांची निवासस्थाने तसेच कार्यालयांवर एकूण सहा ठिकाणी धाडसत्र राबविले.

ईडीकडे खातेदार, ठेवीदारांनी नोंदवलेल्या तक्रारीत सिटी बँकेत आनंदराव अडसूळ यांनी भ्रष्टाचार केला आहे. सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेन्शनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम, गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. त्या आधारेच हे धाडसत्र राबवण्यात आले. माजी आमदार तथा बँकेचे संचालक अभिजित अडसूळ व जावई यांची घरे,  कार्यालयांची झाडाझडती घेतली. झडतीत  आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे ईडीच्या लागल्याचे समजते.

२००९ मध्ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून अभिजित हे निवडून आले होते.

यासंदर्भात बोलताना माजी आमदार अभिजित अडसूळ म्हणाले की, खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाची तारीख असली की असे उपद्व्याप सुरू असतात. बँकेतील गैरव्यवहारांबाबत आम्हीच अगोदर तक्रार केली आहे. ईडी चौकशीचा हा फार्स लक्ष विचलित करण्यासाठी आहे.

बदनेराचे आमदार रवी राणा म्हणाले की, माजी खासदार यांनी मुंबईतील सिटी बँकेत ९००कोटींचा घोटाळा
केला आहे. याप्रकरणी ईडीकडे आपण स्वतः तक्रार केली होती. त्या अनुषंगानेच कारवाईचा बडगा उगारला
आहे. ठेवीदार, खातेदारांच्या श्रमाची रक्कम बळकावण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

हे देखील वाचा

Manohar Mama Bhosale | मनोहर मामा भोसले विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 183 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  ED | former shiv sena mp adsul son ed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update