ED Summons To Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना खासदार संजय राऊतांना ‘ईडी’कडून पुन्हा समन्स

0
147
ED Summons To Shivsena MP Sanjay Raut | ed summons to shivsena leader and mp sanjay raut again directs him to appear for interrogation today
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ED Summons To Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने (ED Summons To Shivsena MP Sanjay Raut) समन्स बजावले आहे. राऊत यांना आज (बुधवारी) चौकशीसाठी ईडी कार्यालयात (ED Office) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Land Scam) ईडीने संजय राऊतांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी केले आहेत.

 

या आगोदर ईडीने संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. कथित पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीकडून प्रवीण राऊत (Praveen Raut) आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांची 9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. त्याचबरोबर काही दिवसापुर्वी राऊत यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला आहे.

 

संजय राऊत यांची 1 जुलै रोजी ईडीने तब्बल 10 तास चौकशी केली होती. ईडीही केंद्राची तपास यंत्रणा असून आपण ईडीला पूर्ण सहकार्य केलं. त्यांच्या मनात काही शंका असतील तर आमच्या सारख्या लोकांनी त्या दूर केल्या पाहिजेत, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला होता.

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
अशातच संजय राऊत यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे.
राज्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांना बजावलेली नोटीस महत्त्वाची मानली जाते. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

 

Web Title :- ED Summons To Shivsena MP Sanjay Raut | ed summons to shivsena leader and
mp sanjay raut again directs him to appear for interrogation today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा