Shivsena MP Sanjay Raut | “संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा देना हैं” – संजय राऊतांचं ट्वीट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | महिन्याभरापासून शिवसेनेमध्ये (Shivsena) अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्ताबदल झालं. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट असा राजकीय सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नेतृत्व तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांना शिवसेना संपवण्यास जबाबदार धरले आहे. तर दुसरीकडे संजय राऊतही बंडखोर आमदारांवर सतत घणाघात करत आहेत.

 

 

दरम्यान, संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये राऊत यांनी लेखक प्रेमचंद यांची एक ओळ ट्वीट केली आहे. “संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा देना हैं…! – प्रेमचंद”. या ट्वीटसोबत राऊतांनी उद्धव ठाकरेंचा हात धरलेला आपला एक फोटोही शेअर केला आहे.

 

शिंदे गटातील आमदारांनी, खासदरांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवले, राष्ट्रवादीसोबत युती करण्यास भाग पाडले, त्याचबरोबर शिवसेना संपवण्याचा कट रचला असे अनेक आरोप भाजपा नेत्यांनी तसेच शिंदे गटातील अनेक बंडखोरांनी केले आहेत. तसेच, संजय राऊतांनी वारंवार कठोर शब्दांत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोरांवर टीका केलीय. त्यामुळे शिंदे गट आणि राऊत असाही राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.

 

Web Title :- Shivsena leader and mp sanjay raut twitter uddhav thackeray shivsena cm eknath shinde bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा