Ahmedabad : 6 वर्षांचा मुलगा बनला जगातील सर्वांत छोटा काॅम्प्युटर प्रोग्रामर, गिनीज वर्ल्ड रेकॉडमध्ये नावाची नोंद

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सामान्यपणे पाच ते सहा वर्षांच्या वयात मुले अभ्यासापासून दूर पळत असतात. परंतु या वयात एखादा मुलगा जगातील सर्वांत छोटा काॅम्प्युटर प्रोग्रामर बनला, तर हे मोठ मोठ्यांना हैराण करणारे आहे. हे काम केले आहे अहमदाबादच्या अरहम तलसानियाने.

अरहमने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वांत छोटा काॅम्प्युटर प्रोग्रामर म्हणून नाव नोंदवले आहे. इयत्ता दुसरीत शिकणार्‍या अरहम तलसानियाने वयाच्या सहाव्या वर्षी शक्तिशाली पायथन प्रोग्रामिंग भाषा परीक्षा क्लीअर करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. ही परीक्षा 23 जानेवारी 2020 ला मायक्रोसॉफ्टद्वारे अधिकृत पियर्सन व्यू टेस्ट सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती.

तर याबाबत तलसानियाने मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले की, माझ्या वडिलांनी मला कोडिंग शिकवले आहे, जेव्हा मी केवळ 2 वर्षांचा होतो, तेव्हा मी टॅबलेट वापरण्यास सुरुवात केली होती. वयाच्या तिसर्‍या वर्षी मी आयओएस आणि विंडोजसह गॅझेट्स खरेदी केले. यानंतर मला समजले की, माझे वडील पायथनवर काम करत होते. अरहमने सांगितले की, जेव्हा मला पायथनकडून प्रमाणपत्र मिळाले, तेव्हा त्यावेळी मी छोटे गेम बनवत होतो. त्यांना मला कामाचे काही प्रूफ पाठवण्यास सांगितले होते. मी पाठवले. यानंतर काही महिन्यांनी, त्यांनी मला मंजुरी दिली आणि मला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे सर्टिफिकेट मिळाले.

अरहम तलसानियाला भविष्यात एक बिझनेस एंटरप्रेन्युअर बनायचे आहे. याच्या अधारे त्याला लोकांची मदत करायची आहे. याबाबत अरहमने मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले की, मला अ‍ॅप आणि गेम डेव्हलप करायचे आहेत.

अरहम तलसानियाचे वडील ओम तलसानिया, जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्यांनी मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले की, त्यांच्या मुलाने कोडिंगमध्ये रस दाखवला होता. तेव्हा त्यांनी त्याला प्रोग्रॅमिंगच्या बेसिक्स शिकवल्या होत्या. मात्र, तो खूपच छोटा होता, त्याला गॅझेट्समध्ये खूपच रस होता. तो टॅबलेट डिव्हाइसवर गेम खेळत असे. तो पझल्ससुद्धा सॉल्व्ह करत होता. याशिवाय जेव्हा त्याने व्हिडिओ गेम खेळ्ण्यात रुची दाखवण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने ते बनवण्याचा विचार केला. तो मला कोडिंग करताना बघत असे.