Eknath Khadse | ‘बावनकुळे स्पष्ट बोलणारा माणूस…’ एकनाथ खडसेंनी बानवकुळेंच्या ‘त्या’ विधानावरुन शिवसेनेला डिवचलं

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची भाजपसोबत युती (Shiv Sena BJP Alliance) आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections-2024) भाजप ठाकरे ब्रँडशिवाय असलेल्या शिवसेनेला कसं स्थान देणार, यावरुन तर्क-वितर्क लढवले जात असताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकीत भाजप 240 जागा लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मात्र बावनकुळे यांचे कौतुक केले आहे. बावनकुळे हे मनमोकळ्या मनाचा आणि स्पष्ट बोलणारा माणूस असल्याचे खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले.

चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक करताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, बावनकुळे मनमोकळ्या मानाचा आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे. त्यांच्या कधी ओठात एक आणि पोटात दुसरं असं नाही. कार्यकर्त्यांसमोर स्पष्टपणे त्यांनी त्यांची सत्य भूमिका मांडली. यावरुन असं दिसतंय की शिवसेना शिंदे गटाकडे (Shinde Group) भाजप दुर्लक्ष करत आहे. पुढच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये (Lok Sabha Elections-2024) शिंदे गटाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम भाजप करेल, असा टोला खडसेंनी लगावला.

288 पैकी 48 जागा ह्या शिवसेनेच्या शिंदे गटाला आणि उरलेल्या 240 जागा भाजपला.
शिंदे गटाकडे सध्या 40-42 जागा आहेत. त्या लढवायच्या आणि 10-12 जागा निवडून अणायच्या.
बावनकुळेंनी मांडलेली भूमिका स्पष्ट आहे. शिंदे गट हा महाराष्ट्रात लहानसा गट आहे,
असा थेट हल्लाबोल एकनाथ खडसेंनी केला.

काय म्हणाले बानवकुळे?

एका खासगी कार्यक्रमात बोलताना बावनकुळे यांनी शिवसेना-भाजपमधील संभाव्य जागावाटपचा फॉर्म्युला
जाहीर केला होता. 2024 मध्ये भाजपचे 150 ते 170 आमदार 100 टक्के निवडून येतील.
आपण 240 च्या आसपास सीट लढवण्याचा विचार करत आहोत. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे 50 पेक्षा
जास्त आमदारच नाहीत, असे बावनकुळे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची क्लिप काही वेळात सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली.

Web Title :- Eknath Khadse | eknath khadse has criticized shivsena on a statement of bjp state president chandrashekhar bawankule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde – Gopinath Munde | लोकनेते गोपीनाथराव मुंडे अठरा पगड जातींना न्याय देणारे व्यक्तिमत्व – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MP Sanjay Raut | देवेंद्रजी, गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का?, संजय राऊतांनी बार्शीमधील ‘त्या’ पीडित मुलीचा फोटो केला शेअर

Pune ACB Trap | पोलिस निरीक्षकाकरिता 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारा निघाला आमदाराचा चुलत भाऊ, युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’