Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचं आणखी एक ट्विट जारी; म्हणाले – ‘ही आहे शिवसेना आमदारांची भावना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde | शिवसेनेच्या आमदारांचं बंड पाहता शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल ऑनलाईन संवाद साधत भावनिक साद घातली. त्यानंतर ते वर्षावरुन मातोश्रीवर गेले. मी राजीनामा द्यायला आणि पक्षप्रमुखपदही सोडायला तयार आहे पण तुम्ही समोर या असं आवाहन केले. मात्र दुसरीकडे शिंदे गटात आमदारांची संख्या वाढते आहे. एकनाथ शिंदेकडून उद्धव ठाकरेंचे आवाहन धू़डकावण्यात आलं. यानंतर आता एकनाथ शिंदेंनी आणखी एक ट्विट करत आमदारांची भावना व्यक्त केली.

 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विटरद्वारे एक पत्र जाहीर केलं आहे. त्यात, एकनाथ शिंदेंनी शिंदे गटातील आमदारांच्या भावना स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना आणि शिवसेना पक्षप्रमुखांना सांगितल्या आहे. त्यामुळे राजकारणाला मोठं वळण लागलं आहे. ‘ही आहे शिवसेना आमदारांची भावना’, असं ट्विट करत एकनाथ शिंदेनी 2 पानी पत्र जारी केलं आहे.

शिंदे गट शिवसेनेतच असल्याचा दावा करत आहेत.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरेसोबत असलेले आमदार आमची शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान नेमकी शिवसेना कोणाची ? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.
त्यातच शिंदे गटात जवळपास 40 च्या पुढे आमदारांची संख्या असल्याचे समजते. या घडामोडीनंतर एकनाथ शिंदेंचा मोठा प्लॅन काय असणार हे पाहावे लागेल.

 

Web Title :- Eknath Shinde | Another tweet from Eknath Shinde released Said This is the sentiment of Shiv Sena MLAs

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा