Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | शिंदे गटाने ठाकरेंना डिवचलं, मातोश्री बाहेर बॅनरबाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघ नखे (Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh) परत भारतात आणण्यासाठी नुकताच राज्य सरकारने लंडन येथे जाऊन करार केला आहे. मात्र काही इतिहासकारांनी आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ही वाघ नखं खरी आहेत का? असा सवाल करत वाघ नखांबाबत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आता शिंदेगटाने ठाकरेंना डिवचण्यासाठी थेट मातोश्रीबाहेरच बॅनर (Shinde Group Banner Outside Matoshree) लावले आहेत. (Eknath Shinde Vs Uddhav Thackeray)

माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘तीच वाघनखे आणणार परत, शिंदे सरकारने घेतले व्रत’ असे या बॅनरवर लिहिलं असून हे बॅनर कलानगर भागात लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बॅनरवर ठाकरेंचे एके काळी निकटवर्तीय राहिलेल्या कुणाल सरमळकर यांचे नाव आहे. (Eknath Shinde Vs Uddhav Thackeray)

कुणाल सरमळकर हे ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय होते.
मात्र, एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सरमळकर यांनी देखील ठाकरेंची साथ सोडली.
कुणाल सरमळकर हे शिंदे गटाचे वांद्रे पूर्वचे विभाग प्रमुख आहेत. त्यांनी थेट ठाकरे राहात असलेल्या कलानगरमध्ये बॅनर लावले आहेत. ‘अफजल दुष्ट संहारिला, श्रीमंत योगी असा आपला, तीच वाघ नखे आणणार परत, शिंदे सरकारने घेतले व्रत, छत्रपतींची घेऊन शपथ, शिंदे सरकार चालते पथ’ अशा ओळी बॅनरवर लिहिण्यात आल्या आहेत.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयाच्या वेबसाईटवर म्हटलं आहे की, ही वाघ नखे जेम्स ग्रॅण्ड डफ या इतिहासकारांच्या
कलेक्शनमधील आहेत. जेम्स ग्रॅण्ड डफ यांचा दावा आहे की, ती वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली.
पण व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवरच असं म्हटलंय की, महाराजांनी ही वाघ नखे वापरली हे नक्की
सांगू शकत नाही. भावनांचा खेळ कुठेही नको, स्पष्टीकरण हवंय, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | राष्ट्रपती राजवटीवरुन फडणवीसांचा गौप्यस्फोट; शरद पवार म्हणाले – ‘भाजपकडे बहुमत होतं, तर…’

Devendra Fadnavis | ‘जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…’ – देवेंद्र फडणवीस

Pune Crime News | नाना पेठेतील टोळीयुद्धात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू; गँगस्टर बंडू आंदेकरासह 6 साथीदारांना अटक