Pune Crime News | नाना पेठेतील टोळीयुद्धात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू; गँगस्टर बंडू आंदेकरासह 6 साथीदारांना अटक

पुणे : Pune Crime News | नाना पेठेत वर्चस्वाच्या वादातून आंदेकर टोळीतील (Andekar Gang) सराईतांनी दोघांवर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरु असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक करण्यात आली. तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आण्णा राणोजी आंदेकर Suryakant alias Bandu Anna Ranoji Andekar (वय ६७, रा. नाना पेठ), कृष्णराज उर्फ कृष्णा सूर्यकांत आंदेकर Krishnaraj alias Krishna Suryakant Andekar (वय ३३), तुषार निलंजय वाडेकर Tushar Nilanjay Wadekar (वय २४), स्वराज निलंजय वाडेकर Swaraj Nilanjay Wadekar (वय २०), पुराराम दियाराम गुजर, आकाश रामदास खरात, आमीर खान यांना अटक करण्यात आली आहे. तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आंदेकर टोळीने केलेल्या हल्ल्यात निखिल आखाडे (वय २९ रा. आंबेगाव पठार, धनकवडी) गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. निखिलचा मित्र अनिकेत दुधभाते (वय २७) जखमी झाला आहे. दुधभाते याने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेत बंडू आंदेकर टोळी आणि सूरज ठोंबरे टोळीत (Suraj Thombre Gang) वैमनस्य आहे. ठोंबरेचा साथीदार सोमनाथ गायकवाड याचे निखिल आखाडे,
अनिकेत दुधभाते मित्र आहेत. गायकवाड याचे बंडु आंदेकर व कृष्णा आंदेकर यांच्याशी वाद आहे.
सोमनाथ गायकवाड हा सध्या येरवडा कारागृहात (Yerwada Jail) आहेत.
आखाडे आणि दुधभाते हे सोमवारी सायंकाळी गणेश पेठेतील शितळादेवी मंदिर चौकातून अशोक चौकाकडे निघाले होते.
त्यावेळी आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला.
या घटनेत आखाडे आणि दुधभाते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान आखाडे याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी अगोदर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी अटक केली होती.
त्यात आता खूनाचे ३०२ कलम वाढविण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे (PI Pramod Waghmare) तपास करीत आहेत.

अटक आरोपींना 7 आक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक दादासाहेब पाटील, एपीआय संजय माळी, तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, पीएसआय सौरभ माने,
पीएसआय सौरभ थोरवे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय भोसले, पोलिस हवालदार गणेश वायकर, प्रमोद जगताप,
रोहिदास वाघीरे, संतोष ढमाळे, गणेश साळवे, महिला हवालदार निलम कर्पे, पोलिस नाईक रहिम शेख,
पोलिस अंमलदार हेमंत पेरणे, प्रफुल्ल साबळे, कल्याण बोराडे,
ज्ञानेश्वर सुर्यवंशी, शरद घोरपडे, कपिल चौरे, अमोल शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…’ – देवेंद्र फडणवीस