भंडारा-गोंदियातील 35 मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रिया रद्द

भंडाराः पोलीसनामा ऑनलाईन

भंडारा-गोंदिया येथे सुरू असलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये दोन्ही जिल्ह्यात सुमारे ४००हून अधिक ईव्हीएम मशीन्स बंद पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा-गोंदियातील 35 मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. मतदान यंत्रातील बिघाडामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत फक्त सहा टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

भंडारा-गोंदियात 450 ईव्हीएम बंद पडल्यामुळे फेरमतदान घेण्याची भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मागणी केली होती. भंडारा येथील लाल बहादूर शास्त्री शाळेत ईव्हीएम बंद पडल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून गोंधळ माजवण्यात आला .दरम्यान, भंडारा येथील तुमसर तालुक्यातील खरबी, हिंगणा, मांढळ आणि खापा मध्ये 11 ईव्हीएम मशिन्स बंद पडले

एकावेळेला इतकी मशीन बंद होतातच कशी? : प्रफुल्ल पटेल

मतदाना दरम्यान दोन्ही जिल्ह्यात सुमारे सव्वाशेहून अधिक ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाल्याने मतदान ठप्प झाले आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत खासादर प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी घडत असलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. याबाबत त्या अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त करून याची चौकशी करण्याचे आश्वासन खासादर पटेल यांना दिले आहे.

या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील एकूण १७ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण २१४९ मतदान केंद्रांमध्ये मतदान सुरू झाले. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळानंतरच बऱ्याच केंद्रांमधील ईव्हीएम मशीन्स बंद पडत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. दरम्यान , उत्तरप्रदेशमध्ये लोकसभेच्या एका जागेसाठी मतदान सुरू आहे. तेथेही चार ठिकाणी इव्हीम मशीन बंद पडल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.