मिरज : लिंगनूरमध्ये विजेचा धक्का लागून सासर्‍याचा आणि सुनेचा मृत्यू

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन

पत्र्याच्या शेडमध्ये विद्यूत प्रवाह उतरल्याचे लक्षात न आल्याने पत्रा शेडला स्पर्श झाल्याने सुनेचा मृत्यू झाला. तर सुनेला शेड मध्ये शॉक बसलेल्याने शेडची पाहणी करण्यासाठी गेलेले सासरे यांचाही शॉक बसून मृत्यू झाला. या घटनेमुळे लिंगनूरमध्ये शोककळा पसरली आहे.  शेड मधील जोडलेल्या वायरचे प्लॅस्टिक कोटिंग निघल्याने संपूर्ण शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरला असवा आणि त्यामुळेच हा अपघात झाल असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बसगोंडा शिवगोंडा कुडचे (वय ७५ ) व सून विद्या भैराप्पा कुडचे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या सुनेचे आणि सासऱ्याचे नाव आहे.

[amazon_link asins=’B07BRJTC7T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c7a43e0c-7895-11e8-9c44-4fe1ef574b4c’]

लिंगनूर येथील कुडचे मळा येथे बसगोंडा कुडचे हे मळ्यात राहण्यास असतात. नेहमी प्रमाणे सकाळी विद्या घरातील कपडे धुवून बाहेर वाळत घातल होती. त्यावेळी पावसाचे थेंब आल्याने कपडे भिजू नयेत म्हणून तेच कपडे घराशेजारी असणार्‍या गोठावजा पत्र्याच्या शेडमध्ये वाळत घालण्यासाठी गेल्या. पत्र्याच्या शेडमध्ये घरातून लाईट घेतली असून यासाठी वापरण्यात आलेल्या वायरीचे वरील कोटींग निघाल्याने पत्र्याच्या शेडमध्ये करंट उतला. पत्र्याच्या शेडमध्ये कपडे वाळत घालण्यासाठी तार बांधण्यात आली आहे.  विद्या कपडे वाळत घालण्यासाठी गेल्या त्यावेळी त्यांचा स्पर्श या तारेला झाला. त्यामुळे त्या फेकल्या गेल्या. विजेचा धक्का जोरात बसल्याने विद्या जोरात ओरडल्या. त्यांच्या आवाजाने घऱातील इतर मंडळी धावत शेडमध्ये आले. विजेचा शॉक बसून विद्या या बेशुद्ध पडल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी विद्याचे पती भैरप्पा यांना बोलवून घेतले. भैरप्पा हे विद्याला गाडीतून सांगली येथील रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच विद्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, सुनेला शेडमध्ये शॉक बसल्याने सासरे बसगोंडा यांनी पत्रा शेडमध्ये जाऊन पाहणी करत होते. त्यावेळी त्यांचा ही स्पर्श कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या तारेला झाला. त्यामुळे त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

विद्या आणि भैराप्पा या दाम्पत्यास दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा तिसरीत असून दोन मुली लहान अंगणवाडीत आहेत. पत्नीला उपचारास नेत असतानाच घरी वाडीलांचाही मृत्यू झाल्याने भैराप्पा यांचेवर मोठे संकट कोसळले आहे.

एकाच घरातील सासू आणि सून दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळ्हळ व्यक्त होत आहे . घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटना स्थळी गर्दी केली होती. मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मोहन जाधव व सहकारी तसेच पोलिस पाटील मलय्या स्वामी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.