अकरा महिन्याच्या मुलाने गिळला रिमोटचा सेल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचा सेल गिळाल्याची घटना आळंदी येथे घडली आहे. सकाळी सव्वासातच्या सुमारास हे मुल रिमोट सोबत खेळत होते दरम्यान खेळता-खेळता त्याने रिमोट जमिनीवर अादळल्यामुळे रिमोटचे सेल बाहेर आले असता त्यामधिल एक सेल त्याने चक्क गिळुन घेतला. हुजैफ तांबोळी असे या मुलाचे नाव आहे. दरम्यान या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, सकाळी सव्वासातच्या सुमारास हुजैफ आपल्या घरात रिमोट सोबत खेळत होता. खेळत असताना त्याने रिमोट आदळला त्यामुळे रिमोटमधील सेल बाहेर आले. दरम्यान रिमोट आदळल्यामळे हुजैफच्या कुटुंबियांना जाग आली. त्यानंतर कुंटुंबियांचे लक्ष नसताना जमिनीवर पडलेला सेल हुजैफने उचलला व लगेच गिळून टाकला.

हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. आता दुर्बिणीच्या साह्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन तो सेल बाहेर काढण्यात येणार आहे.