Elon Musk यांचा दावा, वर्षाच्या अखेरपर्यंत लावली जाईल मनुष्याच्या मेंदूत कम्प्युटर चिप

मुंबई : टेस्ला आणि स्पेस एक्स सारख्या कंपन्यांचे मालक एलन मस्क यांनी म्हटले आहे की, त्यांची कंपनी न्यूरालिंक या वर्षाच्या अखेरपर्यंत ह्यूमन ट्रायल सुरू करेल. म्हणजे लवकरच एलन मस्क यांची कंपनी मनुष्याच्या मेंदूत लावली जाणारी चिप बनवेल आणि ती मनुष्याच्या मेंदूत लावण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करेल.

ही चिप कम्प्युटरला जोडली जाईल. एलन मस्क यांनी चिप लावण्याची माहिती ट्विटरवर एका युजरच्या ट्विटला रिस्पॉन्स करताना दिली. एका ट्विटर युजरने मस्क यांना सांगितले की, ते एका अ‍ॅक्सीडेंटनंतर मागील अनेक वर्षापासून पॅरेलाइज आहेत यासाठी ते क्लिनिकल ट्रायलसाठी नेहमी उपस्थित असतात.

यावर उत्तर देताना मस्क म्हणाले, न्यूरालिंक खुप वेगाने मेहनत करत आहे. जर सर्वकाही ठिक राहीले तर आम्ही यावर्षाच्या अखेरपर्यंत ह्यूमन ट्रायल सुरू करू.

एलन मस्क यांचा हा प्रोजेक्ट 2016 मध्ये लाँच झाला होता. मस्क यांनी 2019 मध्ये सुद्धा याबाबत वक्तव्य केले होते की, ते 2020 च्या अखेरपर्यंत मनुष्यावर टेस्टींग सुरू करतील.

अलिकडेच मस्क यांनी ही माहिती दिली होती की, न्यूरालिंकने नॅनोटेक्नोलॉजीचा वापर करून एका माकडाच्या मेंदूत चिप लावली होती. मस्क यांच्यानुसार वायरलेस चिपच्या माध्यमातून माकड केवळ आपल्या मेंदूनेच व्हिडिओ गेम खेळू शकते. न्यूरालिंकने इतर प्राण्यांवर सुद्धा चिपची टेस्टींग केली आहे. मागील वर्षी एक डुकराच्या मेंदूत चिप लावली गेली होती.

मस्क यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, चिपच्या माध्यमातून लकव्याची समस्या बरी करता येऊ शकते. यासोबतच मनुष्याला टेलीपॅथीची शक्ती सुद्धा मिळू शकते. काही काळापूर्वी मस्क यांनी न्यूरालिंकमध्ये नोकरीच्या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा टाकली होती.