Emraan Hashmi | अभिनेता इमरान हाश्मीचे ‘हे’ रोमॅटिंक सिनेमे चित्रपटप्रेमींनी पाहायलाच हवे

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा किसिंग किंग अशी ओळख निर्माण करणार अभिनेता म्हणजे इमरान हाश्मी (Emraan Hashmi) याची लोकप्रियता अफाट आहे. इमरान हाश्मीने बॉलीवुडचा एक काळ अक्षरशः गाजवला आहे. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अभिनेता इमरान हाश्मी याचे अनेक चित्रपट (Emraan Hashmi Movies) आहेत जे तरुणाच्या मनात आजही घऱ करुन आहेत. त्याची हटके स्टाईल आणि त्याच्या अंदाज यामुळे इमरान हा बॉलीवुडमधील मोस्ट वांटेड रोमांटिक हिरो (Most Wanted Romantic Hero In Bollywood) झाला होता. त्याच्या किसिंग सीनची (Emraan Hashmi Kissing Scene) चर्चा सर्वत्र असायची. आजही प्रेक्षक त्याचे जुने सिनेमे तेवढ्याच आवडीने बघतात. अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) याचे काही असे चित्रपट आहेत जे प्रत्येक बॉलीवुडप्रेमीने पाहायलाच हवे.

अभिनेता इमरान हाश्मी याने त्याच्या अभिनयाने वेगळी जागा निर्माण केली होती. त्याने ‘फुटपाथ’ (Footpath) या चित्रपटामधून सिनेविश्वामध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2004 साली त्याचा ‘मर्डर’ हा चित्रपट (Murder Movie) प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाने तो प्रकाशझोतात आला. ‘मर्डर’ या लोकप्रिय चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसु (Anurag Basu) यांनी केले होते. मर्डर चित्रपटामुळे इमरानला वेगळी ओळख मिळाली. यामध्ये अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) हिने इमरान सोबत प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याचा 2006 साली ‘गॅंगस्टर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटामुळे इमरानचे करिअर अधिक उंचीवर गेले. ‘गॅंगस्टर’ चित्रपटाचे (Gangster Movie)) दिग्दर्शन देखील अनुराग बसु यांनी केले होते. अभिनेता इमरान आणि दिग्दर्शक अनुराग बसु यांची जोडी तेव्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होती. या चित्रपटामध्ये अभिनेता इमरान सोबत अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) हिने स्क्रीन शेअर केली होती.

अभिनेता इमरान हाश्मी याचा मोठा चाहता वर्ग आहे. आजही प्रेक्षक त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. 2008 साली प्रदर्शित झालेला त्याचा ‘जन्नत’ हा चित्रपट (Jannat Movie) देखील खूप गाजला होता. क्रिकेटच्या विश्वातील बेकायदेशीर सट्टेबाजीवर आधारित हा चित्रपट होता. यामध्ये इमरानने मॅच फिक्सिंगमध्ये अडकलेल्या जुगाराची भूमिका साकारली होती. शेवट पर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 2010 साली अभिनेता इमरान हाश्मी यांचा ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ हा चित्रपट (Once Upon a Time in Mumbai Movie) प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्याला इंडस्ट्री मध्ये येऊन 13 वर्षे झाल्याबद्दल हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये त्याने शोएब खान हे पात्र साकारले होते. यामध्ये तो अभिनेत्री प्राची देसाई (Prachi Desai) सोबत रोमांस करताना दिसला होता. चित्रपटातील गाणी देखील लोकांना खूप आवडली होती.

अभिनेता इमरान खान आणि विद्या बालन (Vidya Balan) यांचा
‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट (The Dirty Picture Movie) देखील खूप गाजला होता.
2011 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये त्याने अब्राहम हा साईड रोल साकारला होता.
चित्रपटामधील अभिनेता इमरान हाश्मी याच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.
चित्रपट समीक्षकांची देखील वाह वाह मिळाली होती.
आजही अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
या वर्षी त्याचा सेल्फी हा चित्रपट (Selfie Movie) प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
तसेच लवकरच तो अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) ‘टायगर 3’ (Tiger 3 Movie) या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरला चाहत्याने केले गुडघ्यावर बसून प्रपोज; व्हिडिओ व्हायरल