Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरला चाहत्याने केले गुडघ्यावर बसून प्रपोज; व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची क्युट आणि सुंदर अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिला नावाजले जाते. श्रद्धाचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या हास्यांची व अदांची भूरळ तिच्या चाहत्यांवर पडली आहे. ती बॉलीवुडमधील प्रसिद्ध व यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणली जाते. श्रद्धा (Shraddha Kapoor) सध्या सोशल मीडियावर ट्रेन्डिंगमध्ये आहे. कारण तिचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नुकतीच अभिनेत्री श्रद्धा कपूर ही एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी तिला एका चाहत्याने प्रपोज (Shraddha Kapoor Proposed By Fan) केले आहे. श्रद्धाचा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडत आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिचे चित्रपट व हटके फॅशन यामुळे श्रद्धाची मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिला इंस्टाग्रामवर 81.8 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. ती तिच्या आगामी प्रोजेक्ट (Shraddha Kapoor Upcoming Movies) बद्दल सोशल मीडियावर अपडेट देत असते. अभिनेत्री श्रद्धा हिला पापाराझींनी एअरपोर्टवर स्पॉट केले. तिची एक झलक कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी पापाराझी तिच्या मागे लागतात. दरम्यान एका चाहत्याने तिला भलामोठा फुलांचा गुच्छ देत प्रपोज केले. ती कार मधून उतरताच एका चाहत्याने तिला गुड्घावर बसून फुलांचा गुच्छ दिला. श्रद्धाने देखील चाहत्याच्या या प्रेमाचा स्वीकार केला. यावेळी श्रद्धा अतिशय कॅज्युयल लूक मध्ये दिसत होती. तिने व्हाईट कलरचा टॉप व व्हाईट कलरचीच शॉर्ट स्टाईल केली होती. मात्र तिचे शॉर्ट केस लक्षवेधी ठरत होते. अभिनेत्री श्रद्धा कपूरला चाहत्याने गुड्घ्यावर बसून व्यक्त केलेले प्रेम पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिने 2013 साली ‘आशिकी 2’ (Aashiqui 2) चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये दमदार पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटामध्ये तिने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर श्रद्धाने ‘बाघी’ (Baaghi), ‘एक व्हिलन’ (Ek Villain), ‘ओके जानू’ (Ok Jaanu), ‘हाफ गर्लफ्रेंड’ (Half Girlfriend), ‘स्त्री’ (Stree), ‘छिछोरे’ (Chhichhore) या हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकताच तीचा ‘तू झुठी मै मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये तिने अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) स्क्रीन शेअर केली होती. लवकरच श्रद्धाचा ‘स्त्री 2’ (Stree 2) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Disha Patani | दिशा पाटनीच्या रिव्हिलिंग आऊटफिटमधील रॅम्प वॉक पाहून नेटकरी फिदा