ED-सीबीआय चौकशीवरून शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘… तर विरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू होऊ देऊ नये म्हणजे झाले’

मुंबई (Mumbai news): पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – Enforcement Directorate | महाराष्ट्र कोरोना (Maharashtra Corona), आर्थिक, बेरोजगारी (Unemployment) आणि निसर्ग या संकटांचा सामना करत आहे. त्यातच आता नवे संकट म्हणजे ईडी (Enforcement Directorate)  आणि सीबीआय (Central Bureau of Investigation) या सुल्तानी संकटांनाही त्याच पद्धतीने योग्य आहे. काही दिवसांपूर्वी या सुल्तानशाहीशी अशाच पद्धतीने लढून ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी विजय मिळवा होता. महाराष्ट्रानेही आता तोच मार्ग स्वीकारला पाहिजे. मुख्यमंत्र्यानी हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांच्या कानावर घातले असेल. मंगळवारी पवार- ठाकरे चर्चा झाली. त्यामध्ये लढाईचा आराखडा ठरलेच असेल. कुरुक्षेत्राच्या मधोमध श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ नेऊन उभा केला व दुष्मनाशी चौफेर मुकाबला करून अधर्माचा पराभव केला. त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागीच उभे आहे. त्यामुळे विरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू होऊ देऊ नये म्हणजे झाले,” असा इशाराही शिवसेने (Shiv sena) ने मुखपत्र असलेल्या सामना (Samna)च्या अग्रलेखातून दिला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

काय म्हंटल आहे सामनाच्या अग्रलेखात

राज्यतील विरोधी पक्षास काय झाले आहे हेच कळेनासे झाले आहे. सरकार पाडण्याचा त्यांचा आत्मविश्वास साफ तुटला आहे. आता सरकार पडणार नाही तर हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल असे पसरवण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनी सरकार पाडण्याचे किंवा पडण्याचे कितीही ढोल वाजवले तरी यातील काही एक होणार नाही. मंगळवारी शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री यांच्यात तासभर ‘गुफ्तगू’ झाले. त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्ट दिसत होता. गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वासही चांगलाच वाढला आहे आणि काँग्रेस (Indian National Congress) विषयी काय सांगावे! त्यांच्या प्रमुख नेत्यांची अवस्था आत्मविश्वासाच्या बाबतीत चारही बोटे शुद्ध तुपात अशीच असल्याने तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णाच्या रथाप्रमाणे सगळे बाण व हल्ले पचवत विरोधकांशी लढत आहे. असं शिवसेनेने म्हटलं आहे.

मध्यतंरी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाचीच बातचित झाली व आता दोन-पाच दिवसांत पुन्हा एकदा राजभवनात पहाटेची लगबग सुरू होईल असे स्वप्न जर कुणाला पडत असेल तर तो एक राजकीय स्वप्नदोषच म्हणावा लागेल. ठाकरे-मोदी भेटीत असे काय घडले, की लगेच ‘मीडिया महामंडळा’ने धावाधाव करावी व नव्या सरकारनिर्मितीच्या तारखांचे हवाले देत राहावे? या भेटीत ठाकरेंनी पंतप्रधानांशी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीबाबत नक्कीच सांगितले असेल.

सध्या महाराष्ट्रात जी राजकीय व्यवस्था निर्माण झाली आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी भाजपची आहे. शिवसेनेला या परिस्थितीत ढकलेले नसते तर आजचे सरकार आलेच नसते, यावर नक्कीच चर्चा झाली असावी. त्यामुळे आजची जी सदाबहार राज्यव्यवस्था निर्माण झाली आहे त्यासाठी भाजपचे आभार मानावे तेवढे कमीच आहे असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.काही दीर्घद्वेषी मंडळींना मोदी- ठाकरे भेट आवडली नाही. महाराष्ट्राने दिल्लीशी सतत भांडत राहावे. मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्यात सदैव आदळआपट सुरू राहावी किंवा येथील काही लोकांना असेही वाटू शकते की, आम्ही इथे इतके तालेवार लोक असताना मुख्यमंत्री ठाकरे हे आमच्या मध्यस्थीशिवाय मोदींना भेटतातच कसे? त्यांचा हा प्रश्न बरा आहे, पण खरा नाही, असं उत्तर शिवसेनेने दिलं आहे.

शिवसेना त्याच महाराष्ट्र धर्माचे पालन करत आहे

मोदींना जर ठाकरे यांना वैयक्तिक भेटीसाठी इतका वेळ का दिला असा तर त्यावर उत्तर आणि औषध दोन्ही मिळेल. पवारही अधूनमधून मोदी यांना भेटत असतात आणि बोलत असतात. मधल्या अडत्यांची पंतप्रधानांशी संवाद ठेवण्यासाठी गरज नाही आणि उगाच दिल्लीशी महाराष्ट्राने भांडण करण्याचीही गरज नाही. इतिहास आहे ज्यावेळी महाराष्ट्र दिल्लीशी झगडा करतो त्यावेळी दिल्लीला शरण यावे लागते.महाराष्ट्राचे भांडण हे विचारांचे, तत्त्वांचे व राष्ट्रासाठी असते. शिवसेना त्याच महाराष्ट्र धर्माचे पालन करत आहे. केंद्राने संकटकाळी महाराष्ट्राला मदत करायला हवी.

कोरोना संकटात मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना फोन लावून मदत मागितली तेव्हा पंतप्रधानांचा प्रतिसाद सकारात्मक होता, असे मुख्यमंत्री ठाकरे सांगतात.
त्यामुळे आता येथील विरोधी पक्षाला पंतप्रधान महाराष्ट्राला मदत करतात म्हणून राज्य सरकारने वेगळी भूमिका घ्यावी असे वाटत असेल तर ते कच्चे आहेत.
महाराष्ट्रातील काही मंत्री, आमदार, सरकारविषयी सहानुभूती ठेवणारे उद्योजक यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून राज्यातील विरोधी पक्षाने हलचल माजविण्याचा प्रयत्न चालवलेला आहे.
या अशा दबावापुढे सरकार पक्षाने न झुकता प्रतिकार करत राहणे हाच योग्य उपाय आहे.
पवार यांना भलत्याच प्रकरणात ईडीने नोटीस बजावली होती.
त्यावेळी रस्त्यावर उतरून पवार ‘ईडी’ कार्यालयाकडे जायला निघाले.
महाराष्ट्राचे वातावरण तेव्हा ढवळून निघाले होते.
ईडी, सीबीआय किंवा आपले महामहीम राज्यपाल महोदय यांचा वापर करून राज्यातील सरकार अस्थिर होईल हा भ्रमाचा भोपळाच आहे,
असंहि शिवसेनेनं अग्रलेखात म्हंटलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : shivsena saamana editorial ed cbi bjp
maharashtra government pm narendra modi

हे देखील वाचा

Pune Crime News | उच्चशिक्षीत विवाहीतेचा छळ !
पुण्यातील बड्या उद्योजक कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल;
पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे झाला बहिरा

Maharashtra Monsoon | बळीराजांवर अस्मानी संकट !
राज्यात पुढील 10 दिवस पावसाची दांडी, हवामान खात्याचा अंदाज

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्या कारवर सोलापूरमध्ये दगडफेक,
गोळ्या मारल्यातरी गप्प बसणार नाही, पडळकरांची प्रतिक्रिया

7th Pay Commission | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर !
7 वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता ‘या’ महिन्यात मिळणार