भारत -इंग्लंड कसोटी सामन्यात चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही ? BCCI ने घेतला ‘हा’ निर्णय

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय क्रिकेट चाहत्यांना गेल्या वर्षापासून क्रिकेट सामने प्रत्यक्ष मैदानात बघता आले नाहीत. तर करोनानंतर भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. हा सामना भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात होणारे पहिले दोन कसोटी चेन्नईतील चिंदम्बरम स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी प्रथम ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याचा विचार सुरू होता. पण आता त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अशी माहिती टीएनसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली आहे.

या माहितीवरून गेल्या वर्षी आयपीएल सामना झाला पण ते युएईमध्ये झाले. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्ध होणारे सामने मैदानात जाऊन पाहता येतील अशी आशा होती. पण पहिल्या दोन सामन्यांचे आयोजन करणाऱ्या तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने करोनामुळे हे सामने प्रेक्षकांशिवाय होणार असल्याचा निर्णय घेतला आहे. टीएनसीचे सचिव एन रामास्वीमी यांनी करोनाची परिस्थीती पाहता दोन कसोटी सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश देता येणार नाही असे सांगितले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले आहे. चेन्नईमध्ये करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

तस्सेच २० जानेवारी रोजी टीएनसीने निर्णय घेतला आहे. यामध्ये सामने प्रेक्षकांशिवाय घेण्याचा निर्णय बीसीसीआयसोबत घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता बीसीसीआयने भारत आणि इंग्लंड मालिकेत खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करता कोणताही धोका न पत्करण्याचे ठरवले आहे. खबरदारी म्हणून पहिल्या दोन्ही सामन्यांसाठी हा निर्णय घेतला गेला आहे. असे ते म्हणाले, भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका ५ फ्रेबुवारीपासून सुरू होणार आहे. २७ जानेवारी रोजी दोन्ही टीम चेन्नईत पोहोचतील. बायो-बबल मध्ये प्रवेश करण्याआधी त्यांना करोनासंदर्भातील चाचणी करावी लागेल असे सांगितले आहे.