ईशा अंबानीच्या लग्नासाठी झगमगतेय 27 मजली ‘एंटीलिया’

मुंबई : पोलिसनामा – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नासाठी एंटीलिया म्हणजेच त्यांचे राहते घर सजून तयार आहे. जगातील सर्वात महागडे घर म्हणून एंटीलियाची ओळख आहे.  सध्या एंटीलिया लायटिंगने झगमगत असून . याचे मुख्य प्रवेशद्वार लाल रंगाच्या गुलाबाच्या फूलांनी सजवले गेले आहे.

आणि त्यावर गोल्डन कलरच्या पेपरची रॅपिंग केली गेली आहे. ईशा अंबानी आनंद पीरामलसोबत 12 डिसेंबर रोजी याच घरात विवाहबंधनात अडकणार आहे. महिला काही दिवसांपासून ईशाच्या प्री-वेडिंग सेरेमनीचे आयोजन उदयपुरमध्ये करण्यात आले होते. 2 दिवस चाललेल्या या प्री-वेडिंग सेरेमनी साठी बॉलिवूड मधील सेलेब्स आणि जगभरातील नामांकित उद्योगपतींना सहभाग नोंदवला होता.

   एंटीलिया मध्ये आहेत  600 कर्मचारी 
– हे घर 2010 मध्ये तयार झाले असून याघराची देखरेख करण्यासाठी जवळपास 600 कर्मचारी आहेत.

– 200 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 12912 कोटी रुपये एवढी रक्कम घर तयार तयार करण्यासाठी लागली असून याघरामध्ये 3         हेलिपॅड आहेत आणि स्पेशल थिएटरची देखील सुविधा आहे.

– ‘एंटीलिया’ जगातील सर्वातमोठी इमारत असून या 27 मजली उंच असणाऱ्या एंटीलियाला बांधण्यासाठी 400,000 स्क्वेअर फूट एवढी        जागा लागली आहे.

– सुरुवातीचे 6 फ्लोर एंटीलिया मध्ये फक्त पार्किंगसाठी आहेत. तर यामध्ये एकाच वेळी 168 कार पार्क करता येऊ शकतात.
–  पार्किंगच्या वर असणाऱ्या फ्लोअरमध्ये  50 सीटर सिनेमा हॉल असून त्यावर आउटडोर गार्डन देखील आहे.

–  मुकेश अंबानी हे आई,पत्नी आणि मुलांसह टॉप फ्लोरवरुन खालच्या फ्लोर्समध्ये राहतात.एंटीलिया मध्ये सर्वांना राहण्यासाठी सेपरेट       फ्लोर आहेत.
   ‘एंटीलिया’ मध्ये आहेत 9 लिफ्ट 
– मुकेश अंबानीच्या ‘एंटीलिया’ या घरामध्ये एका फ्लोरवरुन दूस-या फ्लोरवर जाण्यासाठी 9 लिफ्ट आहेत.आणि मंदिर देखील आहे.
– याबरोबरच योगा स्टूडियो, आइसक्रीम रुम आणि जवळपास तीनपेक्षा जास्त स्विमिंग पूल देखील आहेत.
* अशी ही  27 मजली उंच असलेली एंटीलिया इमारत आता ईशाच्या लग्नासाठी सजल्याने अधीक आकर्षित वाटत आहे.