‘या’ कारणामुळे करत नाही सलमान ऑनस्क्रीन KISS

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान सिनेमाबरोबरच त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असतो. मग तो त्याच्या लग्नाचा विषय असो अथवा ऑन स्क्रीन हॉट सिन असो. त्याच्या चर्चा तर होणारच. सलमान नुकताच एका विषयामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. सलमान ऑनस्क्रीन किस का करत नाही. असा प्रश्न केला असता या प्रश्नाचा गमतीदार खुलासा त्याचा भाऊ अरबाज खान याने केला आहे.
कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात सलमान, अरबाज आणि सोहेल तिघेही भाऊ एकत्र उपस्थित होते. ‘द कपिल शर्मा’ चा हा एपिसोड अद्याप टेलिकास्ट झालेला नाही. मात्र त्याच्या प्रोमो मधून ही गोष्ट समोर आली आहे. या कार्यक्रमादरम्यान अरबाजने सगळ्यात मोठं सिक्रेट रिव्हील केले आहे. या कार्यक्रमात कपिलने सलमानला एक प्रश्न विचारला जर तुमचा सिन एखाद्या अनोळखी अभिनेत्रींबरोबर असेल तर तुम्ही कंफर्टेबल फील करता का ? त्यावर उत्तर देतांना सलमान म्हणतो. मी तर किस करत नाही. त्यामुळे अनकंफर्टेबल वाटण्यासारखं काहीच नाही मला फारसा तसा काही फरक पडत नाही. सलमान च्या या उत्तरावर अरबाज मस्करी करत हसत याला उत्तर देत म्हणतो. सलमान ‘ऑफस्क्रीन एवढं करतो की, ऑनस्क्रीन करण्याची गरजच पडत नाही’. अरबाजच्या या वक्तव्यावर व्यासपीठावरील उपस्थितांबरोबर प्रेक्षकही हसायला लागतात.
लग्नानंतर कपिल शर्माने 29 डिसेंबर पासून पुन्हा एकदा टीव्हीवर वापसी केली आहे. या शोच्या पहिल्या आठवड्यात सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सारा अली खान, रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी हे आले होते.