‘मिसेज सीरियल किलर’ सीरीजमध्ये जॅकलीन फर्नांडिससोबत ‘या’ दोन अभिनेत्यांची दमदार ‘एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेटफ्लिक्सच्या बहुचर्चित चित्रपटांमध्ये ‘मिसेस सीरीयल किलर’ बनलेली जॅकलिन फर्नांडिसला आपला डिजिटल डेब्यू मिस्टर भेटला आहे. प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयीने या सीरीजसाठी होकार दिला आहे. हेच नाही तर जॅकलिनच्या टायटल रोलच्या या वेब सीरीजमध्ये ‘जी ५’ चे ‘हालिया सिरीज काफिर’ मध्ये शानदार अभिनय करणारा अभिनेता मोहित रैना पण एक दमदार भूमिकेमध्ये दिसणार आहे.

शॉर्ट फिल्म ‘कृति’ मधून डिजिटलमध्ये पदार्पण करणारा आणि भारत सरकारचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले मनोज बाजपेयी म्हणतो की, कृतिने डिजीटल दुनियामध्ये खूप यश मिळवले आहे. यामध्ये ‘मिसेस सिरीयल किलर’चे दिग्दर्शक शिरीष कुंदरने मला या सीरीजसाठी संपर्क केला. मला याची पटकथा खूप आवडली आणि चांगली वाटली. मी यासाठी वेळ वाया न घालविता लगेच होकार दिला. नेटफ्लिक्ससोबत माझा पहिला चित्रपट असेल आणि हा प्रवास आतापर्यंत खूपच शानदार होता.

वेब सीरीज काफिरच्या यशाचा आनंद घेणारा हिंदी सिनेमाचा दमदार अभिनेता मोहित रैना म्हणतो की, ‘मिसेज सीरीयल किलर’ च्या जीवनामध्ये येणाऱ्या या अनोख्या भूमिकेचा माझा अनुभव खूपच शानदार होता. नेटफ्लिक्ससोबत माझा हा पहिला चित्रपट आहे आणि दुनियामधील १५ करोड लोकांपर्यंत या प्लॅटफॉर्मद्वारे सरळ पोहण्याचा विचारच मला खूप उत्साहित करतो. हे वर्ष माझ्यासाठी खूप चांगले होते. मला वाटते की, माझे चाहते माझ्या भूमिकेला पसंत करतील. ‘

 

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ही काळजी

‘बीफ’ खाणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका अधिक

यकृताच्या समस्येसाठी ‘कच्ची पपई’ ठरेल रामबाण उपाय

उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्णयावर बरसल्या मायावती

लोकसभा निवडणूकीत वंचितला डावलणाऱ्या कॉंग्रेसची विधानसभेसाठी ३ जूलैला ‘बोलणी’