‘इंडियन आयडॉल’मध्ये अनु मलिक परत येण्यावर ‘भडकली’ सोना मोहपात्रा, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा, संगीत दिग्दर्शक अनु मलिक सोनी टीव्हीवर जोरदार प्रसिद्ध आहेत. मीटू चळवळींतर्गत लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अनु मलिकला सिंगिंग रियलिटी शो इंडियन आयडॉलमधून बाहेर काढण्यात आले होते पण असे समजले आहे की, अनु मलिक कदाचित शोमध्ये परत येऊ शकेल. यावर सोनाला तीव्र राग आला आहे आणि तिने संगीत दिग्दर्शकाला बरेच अपशब्द वापरेल आहेत.

ट्विटरवर सोना यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. एका ट्विटमध्ये तिनी लिहिले आहे की, ‘इंडियन आयडॉल’ वर एक वर्षात मेटू चळवळीचा आरोपी असलेल्या अनु मलिकला पुन्हा शोमध्ये बोलावणे म्हणजे लोकांच्या तोंडावर मारण्यासारखे आहे जे आपल्या मुलांसाठी अधिक चांगले व सुरक्षित भविष्य पाहतात. सोनाने #AnuMalik #RatReturnsToTheGutter & #SpreadingFilth हा हॅशटॅग वापरला आहे आणि हॅशटॅगच्या माध्यमातून सोनाने अनु मलिकला गटारी उंदीर म्हणले आहे.

इंडियन आयडॉलचा 10 वा सीजन चांगलाच गाजला. या सीजनमध्ये अनु मलिक सोबत नेहा कक्कर आणि विशाल ददलानी हे जज देखील होते. त्या काळात देशातही मीटू अभियान सुरू होते. ज्याअंतर्गत एका महिलेने अनु मलिकवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. ज्यानंतर अनुला शोमधून रिप्लेस केले होते. त्याच्या जागी जावेद अली शोमध्ये जज म्हणून दिसला. लवकरच शोचा 11 वा सीझन सुरू होणार आहे. असे म्हटले जात आहे की, अनु मलिक या सीजनमध्ये पुन्हा जजच्या खुर्चीवर येऊ शकतात.

जेव्हा सोना एखाद्या सेलिब्रिटीवर राग व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वी तिने सलमान खानला ‘पेपर टायगर’ म्हटले होते. सोना म्हणाली की, “या पेपर टायगरची पूजा करणे थांबवा”, सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसचा अहवाल शेअर करताना सोनाने ट्विट केले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like