ग्रामपंचायतीच्या राजकारणात 2 जिल्हा परिषद शिक्षकांची एन्ट्री ?

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन –

मुरबाड तालुक्यात ग्रामपंचयात निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये अनेक पक्षांनी कंबर कसली होती मुरबाड तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायती या शिवसेनेच्या ताब्यात असल्याची चर्चा असून मुरबाड तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचयात ओळखली जाणारी नारीवली ग्रामपंचायत गेली दोन टर्म बिनविरोध झाली असून गावापातळीवर समजोता न झाल्याने निवडणुकीस सामोरे जावे लागले अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत उल्हास बांगर माजी सभापती यांनी वर्चस्व राखले असून निवडणुकीत त्यांनी नऊ पैकी आठ जागा जिंकून ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले. मुरबाड  तालुक्यातील नारीवली ग्रामपंचायतीसाठी सरपंच व उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया सोमवारी पार पडली.
               सरपंच व उपसरपंच पदासाठी दोन अर्ज प्राप्त झाले होते. देवयानी भालचंद्र भोईर सरपंच तर कल्पेश सदानंद सोलसे  उपसरपंच पदासाठी नामांकन अर्ज दाखल केले होते सरपंच पदाच्या पार पडलेल्या निवडणुक प्रक्रियेत  एक मताने देवयानी भोईर सरपंच तर कल्पेश सोलसे उपसरपंच  बाजूने निकाल घोषित करण्यात आला.
                या निवड प्रक्रियेसाठी शासन प्रतिनिधी म्हणून आर.पी.जाधव, ग्रामसेवक आर.एम सुरवसे यांनी काम पाहिले. विजयी गटाकडून सरपंच उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत माजी सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती उल्हास बांगर,गजानन बांगर सर,सेवा सोसायटी चेअरमन तातू भोईर,माजी सरपंच हर्षदा भोईर, रघुनाथ बांगर,जेष्ठ नागरिक यशवंत चौधरी,जि. प. शिक्षक रामचंद्र भोईर,जी. प. शिक्षक शरद चौधरी,ज्ञानेश्वर चौधरी सह सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते
               ग्रामपंचायत नवीन पदभार घेतलेले सरपंच, उपसरपंच,माजी सरपंच आणि उपसरपंच सदस्य यांच्या सत्कार दरम्याम जिल्हा परिषद शिक्षक रामचंद्र भोईर यांनी माजी सरपंच हर्षदा भोईर यांनी मागील पंच वर्षाक मधील भाजप च्या सरपंच हर्षदा भोईर यांनी कश्या पध्दतीने ग्रामपंचायत करोभार सांभाळला याचा सभेत पाडा वाचुन दाखवला यावेळी शंभर टक्के पाणी प्रश्न सोडवला असे सांगून जिल्हा परिषद शिक्षक रामचंद्र भोईर गुरुजी जणू काही पक्षाची बाजूच मांडत असल्याचे भासत होते तर लगेचच त्या पाठोपाठ याच गावातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शरद चौधरीयांनी गावकऱ्यांना गावकरिता मजूर झालेल्या शासकीय दवाखान्याला जागा दिल्यास पुतळे बांधून देऊ अशे भाष्य करताच एक जिल्हा परिषद शिक्षकान कडून अशापद्धतीची  अपेक्षा नसल्याची गावकऱ्यान मध्ये चर्चा रंगात असून येत्या काही दिवसातच या शिक्षकांन बाबत नारीवली येथील सुज्ञ ग्रामस्थ ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्याधिकारी याची भेट घेणार असे बोललेले जात आहे
               निवडणूक कार्यक्रमा दरम्यान भाजपचे जेष्ठ नेते आणि पंचायत समिती माजी सभापती उल्हास बांगर यांनी ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे होती अशी आशा वेक्त करीत येणाऱ्या काळात ग्रामसेवकाने गावाच्या विकासा साठी जास्तीत जास्त वेळ द्यावा असे सांगून आमदारांच्या गावात रस्ता नव्हता तेव्हा माझ्या गावात कोंक्रेट चा रस्ता होता असे ठाम पने सांगितले तर येणाऱ्या पाच वर्षात पंचवीस खाटांचे शासकीय अद्यावत हॉस्पिटल झाले पाहिजे असा आशावाद व्यक्त केला
               मुरबाड तालुक्याच्या राजकारनात आज पर्यंत माध्यमिक शालनतील शिक्षक पाहिलेले आहेत मात्र जिल्हा परिषद शिक्षकही येथील सरपंच निवडणुकी दरम्यान आपली भूमिका मांडत असताना प्रथमच मुरबाड तालुक्याने पाहिल्याने जिल्हा परिषद शिक्षकही येणाऱ्या काळात ओपन राजकारण करतात की काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.