PF खात्यात पैसे आले की नाही, घर बसल्या जाणून घ्या काही सेकंदात

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – केंद्र सरकारने नोकरी करणाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने 2018 – 19 साठी पीएफचे व्याजदर 8.65 टक्के कायम ठेवले आहे. याचा फायदा 6 कोटी खातेदारांना होईल. नोकरी करताना पीएफ मधील रक्कम माहित करणे आवश्यक आहे. ते जाणून घेण्यासाठी एक प्रकार आहे मिस कॉल देणे. यासाठी EPFO ने नंबर जाहीर केला आहे. याशिवाय ऑनलाइन किंवा SMS च्या माध्यमातून PF च्या रक्कमेची माहिती तुम्ही मिळवू शकतात.

मिस कॉल देऊन मिळवा रक्कमेची माहिती –
यासाठी तुम्ही एक मिस कॉल देऊन माहिती मिळवता येईल. यासाठी 011-22901406 या नंबरवर तुम्हाला मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर येणाऱ्या मेसेजमधून तुम्हाला माहिती मिळेल की खात्यात पीएफची किती रक्कम जमा आहे. हा मेसेज AM-EPFOHO कडून येईल. यातून तुम्हाला आवश्यक ती माहिती मिळेल. यात खात्याची संपूर्ण माहिती असते. त्यात मेंबर आयडी, पीएफ नंबर, नाव, जन्म तारीख, ईपीएफ बँलेंस, शेवटीची जमा झालेली रक्कम.

SMS च्या माध्यमातून माहिती –
यासाठी तुम्हाला तुमचा UAN नंबर EPFO बरोबर नोंदणी करावा लागेल. तुम्हाला 7738299899 वर EPFOHO UAN ENG लिहून मेसेज पाठवू शकतात. ही सेवा इंग्रजी, हिंदी सह 10 विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे.

EPFO च्या माध्यमातून –
यासाठी एम सेवा अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर मेंबरवर क्लिक करुन तुम्ही जमा रक्कम, पासबुक सेक्शनमध्ये जाऊ शकतात. यानंतर तुम्हाला UAN आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकावा लागेल.

जमा होते निश्चित रक्कम –
पीएफ मध्ये पैसे जमा करण्यासाठी एक रक्कम निश्चित केली जाते. कर्मचारी आणि कंपनी बेसिक पगाराच्या 12 टक्के रक्कम त्यात टाकते. 12 टक्क्यांतील 8.33 टक्के रक्कम किटी मध्ये जाते तर 3.67 टक्के हिस्सा ईपीएफमध्ये जमा होतो.

You might also like