EPF अकाऊंट करा अपडेट, मिळेल 7 लाख रुपयांपर्यंतचा फायदा; जाणून घ्या योजना

नवी दिल्ली : वृत्त संस्था – EPF | जवळपास प्रत्येक सरकारी योजनेसोबत काही ना काही सायलेंट फीचर (Silent Feature) आवश्य असते, ज्याबाबत सामान्य माणसाला माहिती नसते. परंतु हे सायलेंट फीचर मोठ्या कामाचे असते. अशाच एका फीचरचा एम्प्लॉई प्रॉव्हिडेंट फंड EPF (Employees Provident Fund) मध्ये समावेश आहे.

हे फीचर प्रॉव्हिडंट फंडसोबत मिळणारे जिवन विम्याचे आहे. प्रत्येक सरकारी कर्मचार्‍याला EPF अकाऊंटसोबत 7 लाख रुपयांपर्यंत लाईफ इन्श्युरन्स कव्हर (EDIL Insurance cover) एकदम मोफत मिळते. EPFO आपल्या सर्व सदस्यांना त्यांच्या खात्यासोबत इन्श्युरन्सची सुविधा देते. आणि कर्मचार्‍याच्या पीएफ खात्यासोबतच हा इन्श्युरन्स लिंक केला जातो. सर्वात महत्वाची बाब ही आहे की, हा विमा एकदम मोफत आहे. यासाठी कर्मचार्‍याला कोणतेही अंशदान द्यावे लागत नाही.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या एखाद्या सदस्याचा अचानक मृत्यू झाला तर त्याचे नॉमिनी लाईफ इन्श्युरन्सच्या (Life Insurance) रक्कमेवर क्लेम करू शकतात.

EDLI च्या अंतर्गत मिळते इन्श्युरन्स कव्हर

EPFO सदस्यांना आयुर्विमा कव्हर एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम (EDIL Insurance cover) अंतर्गत मिळते. या स्कीम अंतर्गत ईपीएफओच्या एखाद्या सदस्यांचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला कमाल 7 लाख रुपये दिले जाऊ शकतात. (EPF)

अगोदर याची मर्यादा 3.60 लाख रुपये होती. यानंतर ही मर्यादा 6 लाख रुपये करण्यात आली. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये ही मर्यादा वाढवून 7 लाख रुपये करण्यात आली. बोनसची मर्यादा सुद्धा दिडलाखावरून वाढवून अडीच लाख रुपये करण्यात आले होते.

 

जीवन विमा क्लेमची गणना

 

ईडीएलआय स्कीममध्ये क्लेमच्या गणनेचा फॉर्म्युला (कर्मचार्‍याला मिळालेल्या अखेरच्या 12 महिन्यांच्या बेसिक सॅलरीच्या सरासरीच्या 35 पट)+(शेवटच्या 12 महिन्यांदरम्यान सरासरी पीएफ बॅलन्सच्या 50 टक्के, जे 1,75,000 रुपयांपेक्षा जास्त नसेल) आहे. जर कर्मचार्‍याने लागोपाठ 12 महिने काम केले आहे, तर किमान लाभ 2,50,000 पेक्षा कमी नसेल.

कसा होतो क्लेम

या रक्कमेसाठी क्लेम नॉमिनीकडून पीएफ खातेधारकाचा आजाराने, दुर्घटनेत किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर केला जाऊ शकतो.
यामध्ये एकरक्कमी पैसे दिले जातात. हा इन्श्युरन्स कव्हर सबस्क्रायबरला फ्री मिळतो. यासाठी त्यांना कोणतीही रक्कम द्यावी लागत नाहीत.
PF Account सोबत ते लिंक होते. यासाठी इन्श्युरन्स कंपनीला डेथ सर्टिफिकेट, सक्सेशन सर्टिफिकेट आणि बँक डिटेल्स देण्याची आवश्यकता असते.

निवृत्तीनंतर मिळत नाही क्लेम

EPF अकाऊंटवर होणार्‍या या इन्श्युरन्सचा दावा केवळ तेव्हाच केला जाऊ शकतो,
जेव्हा पीएफ खातेधारकाचा मृत्यू नोकरीच्या दरम्यान झाला असेल.
या दरम्यान तो कार्यालयात काम करत असो किंवा सुट्टीवर असो, यामुळे काही फरक पडत नाही.
नॉमिनी पैशांसाठी क्लेम करू शकतो. निवृत्तीनंतर विमा रक्कमेसाठी क्लेम केला जाऊ शकत नाही.

Web Title : EPF | employees provident fund insurance scheme epfo edli plan epf interest rate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये