EPF Withdrawal Claim | ‘या’ 5 कारणांमुळे रद्द होऊ शकतो तुमचा ‘ईपीएफ विड्रॉल क्लेम’; जाणून घ्या
नवी दिल्ली – EPF Withdrawal Claim | ग्राहक काही परिस्थितीत भविष्य निर्वाह निधीतून आंशिक किंवा ’आगाऊ’ पैसे काढू शकतात. काही दिवसानंतर ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा होतात, परंतु अनेकदा दावा रद्द होतो. यामागील कारणे अनेक आहेत. उदाहरणार्थ बँक डिटेल अपडेट नसणे, मेंबरची चुकीची माहिती, चेक बुक कॉपी आणि हस्ताक्षर स्पष्ट नसणे, KYC मध्ये अर्धवट माहिती असणे. अखेर पीएफ काढण्याचे दावे का रद्द (EPF Withdrawal Claim) होतात ते जाणून घेवूयात…
1. KYC माहिती अपूर्ण असणे :
जर केवायसी डिटेल अपूर्ण आणि सत्यापित नसेल, तर ईपीएफओ पीएफ काढण्याचा दावा रद्द करू शकते.
2. आधार आणि UAN अपडेट नसणे :
आधार पडताळणी झालेले पाहिजे आणि ते युनिव्हर्सल अकाऊंट नंबरसोबत लिंक केलेले असावे. जर युएएनसोबत आधार लिंक नसेल तर क्लेम फेटाळला जाऊ शकतो.
3. हस्ताक्षर स्पष्ट नसणे :
जर मेंबरचे हस्ताक्षर स्पष्ट नसेल आणि कार्यालयातील रेकॉर्डसोबत जुळत नसेल तर दावा फेटाळला जाऊ शकतो.
4. बँक डिटेल अपडेट नसणे :
PF काढण्याचा दावा रद्द होण्याचे आणखी एक कारण EPFO मेंबर पोर्टलवर बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड अपडेट नसणे हे सुद्धा असू शकते.
5. मेंबर डिटेल्सची चुकीची माहिती :
मेंबर डिटेल्स रेकॉर्डसोबत न जुळल्यास दावा फेटाळला जाऊ शकतो. यासाठी सदस्याचे नाव आणि जन्मतारीख योग्य असावी.
Web Title : EPF Withdrawal Claim | these five reasons for rejection of epf withdrawal claim know all details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Crime News | सामाजिक कार्यकर्ता म्हणुन घेणार्या अक्षय बोऱ्हाडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
Pune Minor Girl Rape Case | ‘त्या’ अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी केला बलात्कार, आणखी 6 जणांना अटक