EPFO | पीएफ खातेधारकांना फ्री मिळते ‘ही’ 7 लाख रुपयांची सुविधा, जाणून घ्या केव्हा आणि कसा करावा क्लेम ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) खातेदार असाल तर EPFO आपल्या सबस्क्रायबर्सला त्यांच्या निवृत्तीनंतर फंड आणि पेन्शनचा लाभ देते. सबस्क्रायबर्सचा मृत्यू झाल्याच्या स्थितीत त्याच्या कुटुंबाला फॅमिली पेन्शनचा लाभ उपलब्ध करून दिला जातो. ईपीएफओकडून आपल्या कर्मचार्‍यांना जीवन विमा सुविधा दिली जाते. ईपीएफओ आपल्या सदस्यांना 7 लाख रुपयांपर्यंत जीवन विमा (Life Insurance) ची सुविधा देते.

काही महिन्यापूर्वीच एम्प्लॉय डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम, 1976 (EDLI Scheme) अंतर्गत देण्यात येणार्‍या विमा रक्कमेची मर्यादा आता 6 लाखावरून वाढवून 7 लाख रुपये केली आहे.
याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

जाणून घ्या काय आहे नियम?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सबस्क्रायबर्स/मेंबर इम्प्लॉइजला जीवन विमा सुविधा सुद्धा देते.
ईपीएफओचे सर्व सबस्क्रायबर्स इम्पलॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम 1976 (EDLI) च्या अंतर्गत कव्हर होतात.

कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखालील ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (सीबीटी)
ने 9 सप्टेंबर 2020 ला EDLI योजनेंतर्गत कमाल विमा रक्कम वाढवून 7 लाख रुपये कर÷ण्याचा निर्णय घेतला होता.
विशेष म्हणजे EDLI योजनेंतर्गत उपलब्ध या विमा कव्हरसाठी पीएफ खातेधारकाला वेगळा कोणताही इन्श्युरन्स प्रीमियम द्यावा लागणार नाही.

 

Web Title : EPFO | epfo subscribers get 7 lakh free benefits in edli scheme check how and when to claim

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sachin Vaze | सचिन वाझेनं अनिल देशमुखांच्या सचिवाकडे दिल्या होत्या पैशांनी भरलेल्या 16 बॅगा, आरोपपत्रात खुलासा

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी कधीही करू नये ‘या’ 5 लक्षणांकडे दुर्लक्ष; मोठ्या समस्येचा आहे संकेत, जाणून घ्या

PM Modi’s Birthday | ‘PM मोदींच्या वाढदिवशी लसीकरणाचा नवा विक्रम; 2 कोटींचा आकडा गाठला