EPFO | पीएफ कर्मचार्‍यांसाठी लवकरच खुशखबर ! अकाऊंटमध्ये येणार मोठी रक्कम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO | सरकारी आणि खासगी कंपनीत काम करणार्‍या ज्या कर्मचार्‍यांचा पीएफ (PF) कापला जातो अशा कर्मचार्‍यांना ईपीएफओ दिवाळीपूर्वी मोठी भेट देऊ शकते. लवकरच पीएफ कर्मचार्‍यांच्या खात्यात 8.5 टक्के व्याजदराने व्याज जमा केले जाऊ शकते. ईपीएफओचे खातेदार असलेल्या सुमारे 6 कोटीपेक्षा जास्त लोकांना व्याजाचा लाभ (EPFO) होईल.

– इतके येईल व्याज

EPFO च्या सेंट्रल बोर्डने 8.5% व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने 8.5% व्याजावर अर्थ मंत्रालयाची मंजूरी मागितली आहे. शक्यता आहे की लवकरच अर्थ मंत्रालय यावर शिक्कामोर्तब करू शकते. फिस्कल ईयर 2020-2021 साठी ईपीएफओला अर्थ मंत्रालयाकडून 8.5% व्याजावर मंजूरी मिळताच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील.

– जाणून घ्या सविस्तर

तुम्ही एसएमएसद्वारे पीएफ खात्याचा बॅलन्स चेक करू शकता. परंतु यासाठी तुमचा UAN नंबर EPFO सोबत रजिस्टर्ड असायला हावा.

रजिस्टर्डम मोबाइल नंबरवरून EPFOHO UAN लिहून 7738299899 वर एसएमएस करावा लागेल.

तुमचा बॅलन्सशी संबंधी डिटेल्स हिंदीसह इतर काही भाषेत तीन अक्षरांचा कोड लिहावा लागेल. हिंदीसाठी EPFOHO UAN HIN लिहून मेसेज करावा लागेल.

– ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन पहा

EPFO च्या वेबसाइटवर लॉग इन करा. इन पेजवर ई-पासबुकवर क्लिक करा.

ई-पासबुकवर क्लिक केल्यानंतर नवीन पेजवर याल.

तुमचे यूजर नेम (UAN नंबर), पासवर्ड आणि कॅप्चा भरावा लागेल.

सर्व डिटेल्स भरल्यानंतर एक नवीन पेज वर याल आणि येथे मेंबर आयडी निवडावा लागेल.

येथे ई-पासबुकवर आपला ईपीएफ बॅलन्स पहायला मिळेल.

 

Web Title : EPFO | pf employees have fun huge amount going account know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

CBSE Datesheet 2021 | येथून डाऊनलोड करू शकता सीबीएसई सत्र-1 वेळापत्रक, सत्र-2 परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये

Pune Crime | पुण्यात भाईगिरी ! जेलमध्ये असतानाची हप्ता वसुली बुडाली; कारागृहातून बाहेर आल्यानंतर पान टपरी चालकाच्या खूनाचा प्रयत्न

IAS Manisha Patankar-Mhaiskar | ट्रेकिंगसाठी गेलेल्या महिला आयएएस अधिकाऱ्यावर मधमाशांचा हल्ला