तोकड्या कपड्यातील ‘त्या’ फोटोमुळे ईशा गुप्ता झाली TROLL, ‘या’ सिंगरने दिले ट्रोलर्सना उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आपल्या आयुष्यातील अनेक छोटे मोठे अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांना देत असतात. याशिवाय त्यांचे नवीन नवीन फोटोही ते चाहत्यांसाठी शेअर करत असतात. परंतु अनेकदा बोल्ड फोटो शेअर करणं हे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकते. अनेकदा ते ट्रोलिंगचे शिकार होतात. या यादीत सर्वात आधी ईशा गुप्ताचं नाव घेतलं तर काही वावगं ठरणार नाही. सध्या तिच्या ताज्या फोटोमुळे लोक तिला ट्रोल करत आहेत. नुकताच ईशाने तिच्या इंस्टावरून एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्यात ती सुंदर आणि हॉट दिसत आहे.

https://www.instagram.com/p/ByM2r9CgSew/

ईशाच्या या हॉट फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. परंतु असेही काही लोक आहेत जे अभद्र शब्दात कमेंट करत आहेत. एकाने ईशाच्या फोटोवर कमेंट करत म्हटले आहे की, ‘बेबी तुझ्याकडे कपडे नाहीत का.’ याशिवाय सुप्रसिद्ध रॅपर रफ्तारने या ट्रोलर्सना चांगलेच उत्तर दिले आहे. रफ्तारने लिहिले की, ‘तुझ्याकडे दंतमंजन नाहीये का. तोंड स्वच्छ ठेवत जा तुझं’ रफ्तारने दिलेल्या उत्तराने ट्रोलर्सची बोलतीच बंद झाली. त्यानंतर त्याने काही लिहिण्याची हिंमतच केली नाही.

https://www.instagram.com/p/Bx_rZZFA0NF/

तुम्हाला माहितच असेल की, ईशा गुप्ता इंस्टावर नेहमीच सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशलवर शेअर करत असते जे तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडत असतात. असे असली तरी कधी कधी ती ट्रोलिंगची शिकार बनते. सध्या तरी तिच्या ट्रोलर्सना चांगले उत्तर मिळाले आहे.

https://www.instagram.com/p/ByPYYNRA3jx/